अवयवदाना जागृतीसाठी "अवयवदान पदयात्रा"

लक्ष्मण डुबे 
शनिवार, 3 मार्च 2018

रसायनी (रायगड) : रसायनी परिसरातील शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांत "अवयवदान पदयात्रा" सदस्यांनी अवयवदाना बाबत जागृती केली. प्रारंभी रसायनीत पदयात्रा पोहोचली. तेव्हा रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे माजी अध्यक्ष नागेश कदम यांनी सर्वांचे स्वागत केले. अवयवदान पदयात्रे मध्ये 10 सदस्य सहभागी झाले आहेत. 

'अवयव दाना' बाबत प्रिया स्कूल मोहपाडा, चौक येथील जिल्हा परिषद शाळा आणि पिल्लई कॉलेज रसायनी मधील विद्यार्थ्यांना पुरुषोत्तम पवार, सुनील देशपांडे, आपटे काका, शैलेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना याबाबतीत मार्गदर्शन केले. पिल्लाई कॉलेजमध्ये झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष दीपक चौधरी, सचिव गणेश काळे, राजन म्हात्रे, मोहोपाड्याचे माजी सरपंच संदीप मुंढे, प्राचार्य अमर मांगे आदि उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल सुनील भोसले, सिप्ला कंपनीच्या उल्का धुरी यांचेही सहकार्य लाभले. अवयव दान पदयात्रे मुळे या गावात अवयव दानाचे कार्य अविरत चालू राहील आशी आशा सदस्यांनी व्यक्त केली आहे. तसेच रसायनीहून अवयवदान पदयात्रा पुढे मार्गस्थ  झाली. त्यावेळी मुंबई पुणे जुना महामार्गावर दांडफाटा येथे रोटरीचे साहाय्यक प्रांतपाल सुनिल भोसले व नागे़श कदम यांनी पदयात्रेला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. 

Web Title: Marathi news kokan news rasayani organ donation rally raigad