रत्नागिरी सिंधूदूर्ग न्यायालयाचा शतकोत्तर महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

सावंतवाडी - रत्नागिरी सिंधूदूर्ग न्यायालयाला दिडशे वर्षे पुर्ण होणार आहे. या निमित्ताने दोन्ही जिल्ह्याच्या वतीने शतकोत्तर महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त प्रत्येक तालुक्यात विविध उपक्रम राबविणार येणार असून पोटगी केसेस शुन्य करण्याची संकल्पना सिंधुदूर्ग जिल्ह्याची आहे, अशी माहिती सिंधुदूर्ग जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी दिली.

सावंतवाडी - रत्नागिरी सिंधूदूर्ग न्यायालयाला दिडशे वर्षे पुर्ण होणार आहे. या निमित्ताने दोन्ही जिल्ह्याच्या वतीने शतकोत्तर महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त प्रत्येक तालुक्यात विविध उपक्रम राबविणार येणार असून पोटगी केसेस शुन्य करण्याची संकल्पना सिंधुदूर्ग जिल्ह्याची आहे, अशी माहिती सिंधुदूर्ग जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी दिली.

ठाणे ते सिंधुदूर्ग या तीन जिल्ह्यासाठी राबविण्यात येणार्‍या या न्यायालयाच्या कामकाजाला इतिहास आहे. तो स्मरणिकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून या उपक्रमांना सुरवात करण्यात येणार आहे, असे ही त्यांनी सांगितले. सिंधुदूर्ग जिल्हा बार असोसिएशन आणि सावंतवाडी बार असोशसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आज येथील न्यायालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी श्री नार्वेकर, सावंतवाडी बारचे परिमल नाईक, निता सावंत, अनिल केसरकर, सुहेब डींगणकर, अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री नार्वेकर म्हणाले, रत्नागिरी सिंधुदूर्ग न्यायालयाला तब्बल दिडशे वर्षाचा कालावधी उलटला आहे. पहिल्या वेळी ठाणे ते सिंधुदूर्ग असे डिस्ट्रीक कोर्ट ऑफ कोकण म्हणून रत्नागिरीत न्यायालय होते. त्यानंतर 1987 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर सिंधुदूर्गात नव्याने न्यायालय सुरु करण्यात आले. दरम्यान आता या शतकोत्तर महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी बार असोसिएशनच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात ज्युनियर वकिलांसाठी कार्यशाळा, डॉक्टरासाठी मार्गदर्शन वर्ग, न्यायाधिश परिक्षेकडे आजची नवीन पिढी वळावी यासाठी त्यांच्यासाठी अपेक्षित मार्गदर्शन वर्ग व कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्याबरोबर आजपर्यंतचा या न्यायालयाचा इतिहास, गाजलेले न्यायनिवाडे आदी माहिती देणारे स्मरणिका काढण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. 

विषेश म्हणजे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पोटगीचे आणि घटस्फोटाचे दावे वाढले आहेत. ते शुन्य करण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत, असे श्री नार्वेकर यांनी सांगितले. यावेळी सौ. सावंत म्हणाले, 1994/95 पुर्वी या वकीली क्षेत्रात महिला येण्यास धजावत नव्हत्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. अनेक महिला या क्षेत्रात आपले नाव कमवित आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याबरोबर ग्राम न्यायालयाच्या माध्यमातून आरोपी आणि फिर्यादी यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

गौरवशाली इतिहास मांडणार -

यावेळी श्री. नाईक म्हणाले, दोन जिल्ह्याचे न्यायालय असतानाच मोठा इतिहास आहे. या ठिकाणी स्वत: बाबासाहेब आंबेडकर हे वकीली करण्यासाठी आले होते. तर आताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश चद्रचुड यांचे आजोबा या न्यायालयात दिवाण म्हणून कार्यरत होते. असे अनेक मोहरे आणि नावाजलेले वकील आणि न्यायाधीश आहेत. त्यांचा गौरवशाली इतिहास स्मरणिकेच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

Web Title: Marathi News Kokan News Ratnagiri Sindudurgh Court