एसटीच्या चांगल्या सेवेबद्दल देवरुख आगाराच्या उत्पन्नात वाढ

प्रमोद हर्डीकर
बुधवार, 17 जानेवारी 2018

साडवली : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर यात्रेसाठी प्रवाशांना एसटीने मकरसंक्रांत यात्रा आणि कल्याणविधी सोहळ्यासाठी चांगली सेवा दिली. या यात्रेतून देवरुख आगाराला ५ लाख १ हजार ८४८ रुपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती आगारप्रमुख शशिकांत मोहिते यांनी दिली.

मागील वर्षीपेक्षा प्रवासी संख्या जरी वाढली नसली तरी २१ हजारांनी उत्पन्नात वाढ झाली, असे मोहिते यांनी सांगितले.
देवरुख, साखरपा, संगमेश्वर आदी भागातून एसटीने प्रवाशांसाठी चांगलीने आण केली. या यात्रेसाठी एसटीच्या एकूण ६७० फेर्‍या झाल्या. ३१ हजार ४०८ प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घेतला. या यात्रा कालावधीत एकूण १० हजार ७०४ किमीचा प्रवास झाला. रेल्वे स्टेशनहून दररोज ६ गाड्या खास मार्लेश्वरसाठी सोडण्यात आल्याने रेल्वेने आलेल्या प्रवाशांना, भाविकांना थेट मार्लेश्वर बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यामुळे चाकरमानी यांनी देवरुख आगाराबाबत समाधान व्यक्त केले.

श्री क्षेत्र मार्लेश्वर कल्याण विधी सोहळा आणि त्यानिमित्ताने भरणार्‍या उत्सवासाठी १२ तारखेपासूनच ज्यादा बसेस सोडण्यात आल्या. देवरुख व मार्लेश्वर येथे प्रवाशांना रांगेत उभे राहूनच सुरळीत सेवा देण्यात आली. दोन्ही ठिकाणी सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली होती.
एसटी चालक-वाहक तांत्रिक व कार्यालयीन कर्मचारी, सर्व संघटना यांनी या उत्सव काळात चांगले सहकार्य केल्याचे मोहिते यांनी सांगितले.

Web Title: Marathi news kokan news ST better service revenue expands