सुधागडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड

अमित गवळे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

पाली : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, दोन ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपध्ये प्रवेश केला. नुकतेच येथील भाजप संपर्क कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले.

पाली : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, दोन ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपध्ये प्रवेश केला. नुकतेच येथील भाजप संपर्क कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले.

अनेक वर्ष राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या खवली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. यावेळी प्रवेशकर्ते ग्रा.पं. सदस्य अमोल कांबळे तसेच अभिजीत घाटवळ यांनी सांगितले की खवली ग्रामपंचायतीतील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात आम्ही वारंवार आंदोलन व उपोषण केले. परंतू यावेळी आम्हाला अपेक्षित ते सहकार्य मिळाले नाही. अशावेळी भाजप सुधागड तालुकाध्यक्ष राजेश मपारा यांनी आमच्या आंदोलनाला सातत्याने पाठिंबा दर्शविला. तसेच मपारा यांच्या हाती सुधागड तालुका समन्वय समितीची सूत्रे आल्यानंतर सुधागड तालुक्यात भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभाराचा नारा त्यांनी दिला. यामध्ये खवली पाणीपुरवठा योजनेतील तथाकथीत भ्रष्टाचाराची चौकशी करुन सबंधीतांवर कारवाई करण्याबाबत कृतीशील पावले उचलली जातील असे ग्रामस्तांना आश्वासीत केले.

याबरोबरच खेड्यापाड्यांचा विकास साधण्याची धमक सत्तेत असलेल्या भाजपमध्येच असल्याचे विश्वासाने पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रेश्मा तळकर,ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, सदस्या सुलभा हिलम, आदिंसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे आ.प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. व प्रवेशकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपमध्ये पक्षात प्रवेश केला आहे. तो विश्वास सार्थकी ठरविला जाईल.याबरोबरच खवली ग्रामपंचायतीतील नळपाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्याबाबातची भुमिका घेतली जाईल अशी ग्वाही ठाकूर यांनी दिली.

या पक्षप्रवेश कार्यक्रमास आ. प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सुधागड तालुका संपर्क प्रमुख सतिष धारप, भा.ज.पा जिल्हा सरचिटणीस सुनिल दांडेकर, विष्णु पाटील, भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राउत, सुधागड तालुकाध्यक्ष राजेश मपारा, सुधागड तालुका सरचिटणिस आलाप मेहता, सुधागड तालुका सरचिटणीस शिरिष सकपाळ, राजेंद्र गांधी, आर.को. मराठे, सुशील थळे, गौसखान पठाण,पि.सी पालकर, निखिल शहा, सुधागड तालुका महिला मोर्चा अध्यक्षा निहारिका शिर्के, आरती भातखंडे, आदिंसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

जिल्हाध्यक्ष तथा आ. प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड तालुक्यात भाजपची घोंडदौड जोमाने होत आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत प्रचंड स्फुर्ती व उत्साह निर्माण झाला आहे. पक्षवाढीस अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जनतेच्या विश्वासास अाम्ही कधीही तडा जावू देणार नाही.
- राजेश मपारा, अध्यक्ष, सुधागड तालुका भाजप

Web Title: marathi news kokan news Sudhagad NCP BJP