सुधागडमध्ये नदीकिनारी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

अमित गवळे
शनिवार, 20 जानेवारी 2018

पाली : आसरे गावच्या हद्दीत आंबा नदी किनारी एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी (ता.18) दुपारी सापडला. सुधागड तालुक्यातील परळी आदिवासीवाडीतील लक्ष्मण मोरे (वय 40) यांचा तो मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

जांभुळपाडा दुरक्षेत्र व पाली पोलीसांनी मयत लक्ष्मण मोरे यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. याबाबत बबन जिवा अंगारे, पोलीस पाटील वावे तर्फे आसरे यांनी पाली पोलीस स्थानकांत फिर्याद दिली.

सदर घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस उपनिरिक्षक एल. व्ही. म्हात्रे, पो. ह. श्रीराम खेडेकर, एफ. एस. तडवी, पो .ना. नरेश जाधव आदिंनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

मृत व्यक्तीची ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पाली पोलीस स्थानकांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एफ. एस. तडवी करीत आहेत.

Web Title: marathi news Kokan News Sudhagad Police