महिला बचतगटांचे आर्थिक सशक्तीकरण

women
women

पाली : स्वयं. सहाय्यता बचत गटातील पदाधिकार्‍यांचा महिला सशक्तीकरण मेळावा नुकताच पाली पंचायत समितीच्या स्व. नामदेववशेठ खैरे सभागृहात संपन्न झाला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाली व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे अायोजन करण्यात आले होते

या महिला मेळाव्यात सुधागड तालुक्यातील विविध बचत गटांच्या महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.यावेळी मार्गदर्शन करताना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा जि.प सदस्य सुरेश खैरे म्हणाले की मागील अनेक दशकापांसून महिलांनी बचतगटांच्या सामाजिक चळवळीतून विकास साधला आहे. बचतगटांनी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भरभक्कम स्थान निच्छीत केले आहे. महिला बचतगटांनी समाजात स्थानिक प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. महिलांनी आर.डी.सी.सी बँक व नाबार्डच्या माध्यमातून उपलब्द कर्ज व विवीध योजनांचा स्वयंरोजगार व व्यवसाय वृध्दीगंत करण्यासाठी पुरेपूर वापर करावा व आर्थीकदृष्ट्या सक्षम व्हावे. यावेळी सभापती साक्षी दिघे म्हणाल्या की भारतीय संविधानाने महिला नागरीकांना स्वातंत्र बहाल केले आहे. समाजात मुक्तपणे वावरुन स्वताचा विकास व प्रगती साधण्याची मुभा प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झाली आहे. चुल आणि मुल या चाकोरीबध्द संकल्पनेतून बाहेर पडून महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. येत्या काळात महिलांनी अधिकाधिक सशक्त व सक्षम झाले पाहिजे. 

महिलांनी विवीधांगी शासन योजना व उपलब्द संधीचा वापर करुन सर्वांगिण प्रगती साधावी. महिला सक्षम झाल्या तर निच्छीतपणे राष्ट्राची प्रगती साधली जाईल. नाबार्डचे डी.डी.एम. सुधाकर रघतवान यांनी सांगितले की महिला सक्षमीकरण व सशक्तीकरणाकरीता नाबार्ड्च्या विवीध योजना असतात. त्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. नाबार्डच्या माध्यमातून ई- शक्ती मोबाईल ऍप लवकरच लॉच करण्यात येणार असल्याची माहिती रघतवान यांनी दिली. तर विस्तार अधिकारी श्री जाधव यांनी यावेळी राष्ट्रीय ग्रामीण जिवन्नोत्ती अभियान अंतर्गत योजानांची माहिती दिली.

महिला सशक्तीकरण मेळाव्यात रमाबाई महिला बचतगट सिध्देश्वर व भिमस्मृती महिला बचतगटाची स्थापना करण्यात आली. तसेच सिध्दी विनायक बचतगट पाली व मरिमाता महिला बचत गट पाली या बचतगटांना कर्जमंजुरीचे पत्र देण्यात आले. वक्रतुंड जे.एल.जी पाली व शर्मीला जे.एल.जी पाली बचतगटांना व्यवसायाकरीता कर्जमंजूरी पत्रे देण्यात आली.

या मेळाव्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा जि.प सदस्य सुरेश खैरे, नाबार्डचे डी.डी.एम सुधाकर रघतवान, पाली सुधागड पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, पं.स. सदस्या सविता हंबिर,आर.डी.सी.सी बँक पाली शाखेचे व्यवस्थापक बि.सी.पाटील, बँक शाखा निरक्षक एन.एन. नागे, ग्राम विस्तार अधिकारी श्री जाधव, सुधीर साखरले, समृध्दी यादव, एस.एल.म्हात्रे, सि.के.मेंगाल, विनोद शिंदे, वृषाली वैद्य, प्रशांत जोशी आदिंसह बचत गटाच्या महिला पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com