जातीच्या दाखल्यासाठी लाखे बांधवांचे प्रांतधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

शासनाच्या नव्या धोरणाची अंमलबजावणी करून अथवा जुन्या अध्यादेशाला अनुसरून आम्हाला दाखले देण्यात यावे, अशी मागणी लाखे बांधवाच्या वतीने आज येथे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे करण्यात आली.

सावंतवाडी - येथील जिमखाना भागात गेली अनेक वर्षे स्थायिक झालेल्या कोल्हाटी डोंबारी समाजातील लाखे बांधवाना गेली सहा वर्षे जातीच्या दाखल्यापासून वंचित राहावे लागले आहे. शासनाच्या नव्या धोरणाची अंमलबजावणी करून अथवा जुन्या अध्यादेशाला अनुसरून आम्हाला दाखले देण्यात यावे, अशी मागणी लाखे बांधवाच्या वतीने आज येथे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे करण्यात आली.

दरम्यान काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्यामुळे दाखले देण्यास अडचणी होत्या. मात्र आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार जुन्या दाखल्याच्या आधारे किंवा शासनाचा अध्यादेश द्या. आपण दाखले देण्यासाठी योग्य तो प्रयत्न करू, असे आश्‍वासन खांडेकर यांनी यावेळी दिले. येथील भाजपाचे शहर अध्यक्ष संजू शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली आज श्री खांडेकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी सावंतवाडी लाखे समाजाचे अध्यक्ष मयुर लाखे, सुभाष लाखे, अजय लाखे, भरत लाखे, राकेश लाखे, अमित लाखे, पल्लवी लाखे, सुरभी लाखे, निकीता लाखे, सिमा सोनटक्के, सुभाष खोरागडे, तानाजी सोनटक्के, सुरेश सोनटक्के, विकी लाखे आदी उपस्थित होते.

समाज बांधवाच्या वतीने महेश लाखे यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, आमचा डोंबारी समाज हा भटक्या जमातीत मोडतो तर प्रशासनाकडून जातीच्या दाखल्यासाठी 1958 पुर्वीचा पुरावा मागितला जातो. मात्र तो देणे शक्य नसल्यामुळे सन 2013 मध्ये नगरसेवकांचा रहिवाशी दाखला तसेच अन्य जुजबी कागदपत्रे घेवून जातीचा दाखला देण्यात यावा, असे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र त्या आदेशाची अमंलबजावणी काही कारणामुळे होताना दिसत नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य केवळ जातीच्या दाखल्यामुळे रेंगाळल्याचे चित्र आहे.

यावेळी श्री. शिरोडकर म्हणाले, कोल्हाटी डोंबारी समाज सावंतवाडीत गेले. अनेक दिवस स्थायिक आहे. त्यांना यापुर्वी जातीचे दाखले देण्यात आले होते. मात्र आता काही कारण पुढे करुन त्यांना दाखले नाकारण्यात येत आहे. परिणामी त्या समाताजील मुलांना विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता तात्काळ संबधितांना दाखले देण्याची योग्य ती व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आम्ही आज श्री खांडेकर यांच्याकडे केली आहे. 

आणखी काय नको फक्त दाखले द्या 
यावेळी मयुर लाखे म्हणाले, या ठिकाणी आमचा समाज सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणतेही कामे कींचा आव्हाने पेलण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यामुळे आम्हाला शासनाकडून फक्त जातीच्या दाखल्याची अपेक्षा आहे. बाकी आम्ही काय मागत नाही.

Web Title: marathi news kokan savantwadi dombari society lakhe community