भाजप सरकारने अजूनही अच्छे दिन दाखविले नाहीत - सुनिल तटकरे  

marathi news kokan sunil tatkare speech anant geete bjp
marathi news kokan sunil tatkare speech anant geete bjp

पाली (जि. रायगड) - अच्छे दिनची बतावाणी करत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने अजुनही अच्छे दिन दाखविले नाहीत. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचे भाव मोदी सरकारच्या काळात 4 पटीने वाढले आहेत. डाळीचे भाव सुध्दा वाढले. रविवारी (ता. 4) सुधागड तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात सुनिल तटकरे बोलत होते. 
       
सुनिल तटकरे यांनी मोदी व फडणवीस सरकारवर टिका केली. आघाडी सरकारच्या काळात जागतिक क्रुड ऑईलचे भाव भडकलेले असताना देखील पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी दरात मिळत होते. आता अच्छे दिन इतके आले आहेत की पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव प्रचंड कडाडले आहेत. निवडणुकीच्या काळात भाजपने केलेल्या जाहीरातींवर सुध्दा तटकरे यांनी मिष्किल भाष्य केले. राज्य व केंद्र सरकारच्या जाहिराती खोट्या व फसव्या आहेत. प्रत्येक दिवशी वर्तमानपत्र व टिव्हीवर जाहिरातींचा भडीमार सुरु आहे. जनू जाहीरातीचे युगच आले असल्याचे वाटते. अशा मोठ मोठ्या जाहिरातीतून आजही जनतेची घोर निराशा व दिशाभूल केली जात आहे. करोडोंच्या जाहिरातीतून फलित मात्र शुन्य आहे. जनतेच्या विकासाच्या दृष्टीकोनातून कोणतीच पावले उचलली जात नाहीत. गोरगरीब जनतेच्या खात्यात काहीही काबाडकष्ट न करता 15 लाख रुपये जमा होतील असे सांगण्यात आले होते. त्यामुळे लोकांनी भाजप आणि शिवसेनेला मते दिली. असे आ. तटकरे म्हणाले. शिवसेनेवर तटकरेंनी निषाणा साधला. ते म्हणाले की उध्दव ठाकरे म्हणतात, 'आम्ही सत्तेत आहोत. पण सत्तेत समाविष्ठ नाही.' अशी दुटप्पीपणाची भुमिका शिवसेनेकडून घेतली जाते. भिमा कोरेगाव दंगली संदर्भात तटकरे यांनी राज्य सरकार व पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले. राज्य सरकारला या घटनेची पुर्व कल्पना होती. दंगल योग्य प्रकारे हाताळण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले. जातीयवादी शक्तीला खतपाणी घालण्याचे काम हे सरकार करीत आहे. असा आरोप तटकरे यांनी केला. 

शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाचा त्याग करुन सर्वधर्मसमभाव असलेल्या समतावादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कळंब ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेनेच्या कार्यकर्ते व ग्रामस्तांनी पक्षात प्रवेश केलेला आहे. कळंब गावातील प्रत्येक विकासकामाची बांधिलकी स्विकारली असल्याचे आ. तटकरे यांनी सांगून उपस्थितांना आश्वासित केले. कळंब येथील भुमिपुजन केलेल्या रस्त्याचे काम दोन महिण्याच्या आत पुर्ण केले जाईल अशी ग्वाही तटकरे यांनी दिली. माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांच्या कार्यप्रणालीचे तटकरे यांनी कौतुक केले. माजी जि. प. सदस्या गिता पालरेचा यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात रा. काँ पक्ष संघटना मजबूत झाली असून अधिकाधिक विकासकामे पुर्णत्वास नेली जात असल्याचे तटकरे म्हणाले.   
       
यावेळी कळंब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पांडुरंग आखाडे यांना रा. काँ. पक्षाच्या सुधागड तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.  गिता पालरेचा यांनी जनतेने आजवर दिलेल्या अमुल्य साथ व सहकार्याबद्दल जनतेचे आभार मानून यापुढेही जनतेने असेच प्रेम द्यावे. जनतेला भेडसावणार्‍या प्रश्न व समस्या सोडविण्यास आम्ही कटिबध्द् राहणार असल्याची ग्वाही दिली. 
     
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल, रा.कॉ. पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा, पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, ग.रा.म्हात्रे, रा.कॉ. पक्षाचे सुधागड तालुकाध्यक्ष रमेश साळंके, यशवंत पालवे, अभिजीत चांदोरकर, दिपक पवार, हरिच्छंद्र पाटील, विजय जाधव आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. 

तालुक्यात गितेंची कामे दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा...
केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा देखील तटकरेंनी समाचार घेतला. जनतेच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी मन व संवेदना असाव्या लागतात. काम करण्यासाठी प्रामाणिकपणा व इच्छाशक्ती असावी लागते. सुधागड तालुक्यात पंचायत समिती सभापती व जि. प. सदस्य जेवढी कामे करतात तेवढी कामे सुध्दा अनंत गिते यांच्याकडून झालेली नाहीत. गिते यांच्या निष्क्रीय कारभाराची 4 वर्ष उलटली आहेत. सुधागड तालुक्यात गितेंनी कुठलीच ठोस कामे केलेली नसून तालुक्यात गितेंची कामे दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा असे जाहीर आवाहन तटकरे यांनी केले. वाकण पाली खोपोली मार्ग रुंदीकरण बाधित शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीकडे गितेंनी दुर्लक्ष केले असल्याचे तटकरे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com