मिनीबस एसटीवर धडकून 17 प्रवासी जखमी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर एसटी आणि खासगी मिनीबस यांच्यात झालेल्या अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाले. त्यात मिनीबस चालक गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे वाहतूक एक तास ठप्प होती. या प्रकरणी मिनीबस चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. 

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर एसटी आणि खासगी मिनीबस यांच्यात झालेल्या अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाले. त्यात मिनीबस चालक गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे वाहतूक एक तास ठप्प होती. या प्रकरणी मिनीबस चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. 

एसटीचालक सदाशिव काशिनाथ सुतार (वय 30, रा. सावरे, वारणानगर, कोल्हापूर) हे रत्नागिरी-कोल्हापूर एसटी (एमएच-20-बीएल-2286) घेऊन सकाळी रत्नागिरीतून निघाले. खेडशी नाका येथे समोरच्या वाहनाला बाजू देऊन येणाऱ्या मिनीबसने (एमएम-12-एक्‍यू-4602) रत्नागिरी-कोल्हापूर एसटीला धडक दिली. मिनीबस दीपक मधुकर वीरकर (35, रा. वेल्ये, ता. चिपळूण) हे चालवित होते.

चिपळूण येथून प्रवासी घेऊन ही मिनीबस रत्नागिरीकडे येत होती. मिनीबस एसटीच्या चालकाच्या बाजूने अडकली होती. त्यात मिनीबस चालक दीपक वीरकर अडकले. क्रेनच्या मदतीने पुढील भाग ओढून त्यांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये एसटीमधील तुषार दिलीप पवार (19, रा. विडनी- सातारा), स्वाती अरुण पाटील (31, रा. खाके, ता. पन्हाळा, कोल्हापूर), कुशाप्पा तुकाराम करे (52, देसाई हायस्कूल, मूळ रा. जत), आनंदा बाबूराव पाटील (49, रा. जेलरोड), बाबू रामजी चव्हाण (50, रा. विजापूर), सतीश लालसिंग राठोड (50, रा. विजापूर), आनंदी चंद्रकांत चव्हाण (60, रा. बांबर), दीपक काशिराम सावंत (40, रा. शिपोशी, ता. लांजा), वसंत नारायण सावंत (72, रा. शिपोशी, लांजा), वनिता वसंत सावंत (17, रा. शिपोशी), चालक सदाशिव काशिनाथ सुतार (30), वाहक विजय शामराव साळवी (30, रा. लांजा) हे प्रवासी जखमी झाले. मिनीबसमधील विश्‍वनाथ गोपाळ कणगेकर (54), एकनाथ शांताराम साणवी (35, रा. चिपळूण), सुलताना इब्राहिम बांगी (52, रा. कुरधुंडा), अस्मिता सतीश पवार (17, रा. पानवळ) मिनीबस चालक दीपक वीरकर आदी 17 प्रवासी जखमी झाले. 

ग्रामीण पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्या. विभाग नियंत्रक सौ. अनघा बारटक्के, विभागीय वाहतूक अधिकारी प्रकाश रसाळ, आगार व्यवस्थापक शकील सय्यद, स्थानकप्रमुख सागर पाटील, वाहतूक नियंत्रक रमेश केळकर, सुनील सुर्वे, राजू वैद्य, नीलेश गांगण, बेटकर, सुनील झगडे यांनी अपघातस्थळी मदतकार्य केले. एसटीतील प्रवाशांना तातडीची मदत एसटीतर्फे देण्यात आली.

Web Title: marathi news kolhapur news ratnagiri news ratnagiri-kolhapur st