लग्नपत्रिका वाटताना नवरदेवाचा अपघातात मृत्यू

अमोल टेंबकर
बुधवार, 6 डिसेंबर 2017

किरण रविकांत सावंत असे मृताचे नाव आहे, तर सोबत असलेल्या जखमी युवकाचे नाव कळू शकले नाही. याबाबतची माहिती बांदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिली. किरण याचे तीन दिवसानंतर लग्न होते.

सावंतवाडी : स्वतःची लग्नपत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या युवकाचे अपघाती निधन झाले तर सहकारी जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी दहा वाजता डेगवे येथे घडला.

किरण रविकांत सावंत असे मृताचे नाव आहे, तर सोबत असलेल्या जखमी युवकाचे नाव कळू शकले नाही. याबाबतची माहिती बांदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिली. किरण याचे तीन दिवसानंतर लग्न होते.

दोडामार्ग येथील नातेवाईकांना तो पत्रिका देण्यासाठी अॅक्टीव्हा दुचाकीने जात होता. मात्र डेगवे येथे समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. सहकारी गंभीर जखमी झाला आहे, त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

Web Title: Marathi news Konkan news accident in Sawantwadi