हटाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा जीव धोक्यात

अमित गवळे
बुधवार, 10 जानेवारी 2018

विजवितरण मंडळाचा कारभार अतिशय गलथान आहे.त्यांच्याकडून ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. फक्त वाढिव विजबिल अाकारणी केली जाते.तालुक्यातील विजवितरण कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतात. हटाळेश्वर मंदिराजवळील धोकदायक गंजलेले खांब बदलण्याची जबाबदारी विजवितरण मंडळाची आहे.याबाबत लवकरच संबधित अधिकारी व कर्मचार्यांशी बोलणार आहे.
- राजेश मपारा, अध्यक्ष, सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती

पाली : येथील बाजारपेठेतील मोठ्या तलावाजवळ हटाळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराजवळ असलेले विद्युत रोहित्र (डिपी) लावलेले खांब गंजून जिर्ण झाले असुन ते कधीही पडू शकतात. त्यामुळे मंदिरात येणारे भाविक तसेच इतर नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

हे विद्युत रोहित्र ज्या खांबावर बसविले आहे त्या खांबाना अाणि रोहित्राला अाधार देणारे दोन मुख्य लोखंडी खांब(पोल) पुर्णपणे गंजून जिर्ण झाले आहेत. तसेच गंजल्यामुळे खांबांना होल पडले अाहेत. याच खांबांवर मोठ्या विद्युत वाहिन्या देखिल जोडल्या आहेत. परिणामी हा खांब कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हटाळेश्वर मंदिरात जाणारे भाविक, बाजारपेठेतील नागरीक अाणि अनेक अादिवासी भाजी, फुले व कंद विक्रेत्या महिला या ठिकाणी असतात. तसेच येथे गरबा देखिल भरवला जातो.परिणामी विजवितरण कार्यालयामार्फत जर वेळीच कुठली दखल घेतली गेली नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते.त्यामुळे नागरिकांनी लवकर हे धोकादायक खांब बदलण्याची मागणी केली आहे.

विजवितरण मंडळाचा कारभार अतिशय गलथान आहे.त्यांच्याकडून ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. फक्त वाढिव विजबिल अाकारणी केली जाते.तालुक्यातील विजवितरण कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतात. हटाळेश्वर मंदिराजवळील धोकदायक गंजलेले खांब बदलण्याची जबाबदारी विजवितरण मंडळाची आहे.याबाबत लवकरच संबधित अधिकारी व कर्मचार्यांशी बोलणार आहे.
- राजेश मपारा, अध्यक्ष, सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती

Web Title: Marathi news Konkan news hataleshwar

टॅग्स