जयसिंथ कारखान्यांतील कामगारांचे आंदोलन स्थगित

लक्ष्मण डुबे
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील  जयसिंथ  डायकेम लि आणि जयसिंथ अँन्थ्रोक्युनोन्स लि हे कारखाने कंपनीच्या मालकाने सोळा वर्षापुर्वी टाळेबंदीच्या नावाखाली बंद केला आणि कामगारांना काढुन टाकले आहे. कारखाना बंद झाल्यामुळे सुमारे पाचशे चाळीस कामगारांनवर बेकारीची कु-हाड कोसळली आहे. तसेच या कामगारांची संपूर्ण देणी व्यावस्थापनाने दिली नाही.

रसायनी (रायगड) पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील जयसिंथ डायकेम लि. आणि जयसिंथ अँन्थ्रोक्युनोन्स लि. कारखाना बंद करून काढुन टाकलेल्या कामगारांच्या मागण्यांबाबत कामगारांनी मंगळवार (ता 26) रोजी कारखान्याच्या प्रवेश व्दारा समोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान व्यवस्थापनाने बोलणीची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले. 

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील  जयसिंथ  डायकेम लि आणि जयसिंथ अँन्थ्रोक्युनोन्स लि हे कारखाने कंपनीच्या मालकाने सोळा वर्षापुर्वी टाळेबंदीच्या नावाखाली बंद केला आणि कामगारांना काढुन टाकले आहे. कारखाना बंद झाल्यामुळे सुमारे पाचशे चाळीस कामगारांनवर बेकारीची कु-हाड कोसळली आहे. तसेच या कामगारांची संपूर्ण देणी व्यावस्थापनाने दिली नाही. त्यामुळे  कामगारांनी कोकण श्रमिक संघ अध्यक्ष शाम म्हात्रे यांच्या संघटनेच्या नेतृत्वा खाली  मागण्यांन  बाबतचा पाठपुरावा काही वर्षा पासुन सुरू ठेवला आहे. 

कारखाना बंद झाला तेव्हा त्यावेळी असोसिएशन आँफ केमिकल्स वर्क्स या कामगारांच्या युनियनने सदर प्रकरण न्यायालयात नेले आणि कामगारांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीने तात्कालिन युनियनला हाताशी धरुन कामगारांची फसवणुक केली आसा आरोप कामगार करत आहे. दरम्यानच्या काळात कंपनीने थोडयाशा रक्कमांचे वाटप केले. ही रक्कम टाळेबंदीच्या काळातील वेतनाची म्हणुन दिली होती. असे कामगारांचे म्हणने आहे. कंपनीने आमची कायदेशीर देणी दयावी किंवा कंपनीच्या सेवेत सामावुन घ्यावे आशी आमची मागणी आहे. असे कामगारांनी सांगितले.

कारखाना बंद पडला होता. त्यावेळेच्या आसोशिएशन आँफ केमिकल वर्कस यूनियन आणि व्यवस्थापनाने  संगनमताने कामगारांची मोठी फसवणुक केली आहे. तसेच व्यवस्थापनाने कारखाना मे. जेडी आँर्गोकेम लि. नावाने नऊ दहा वर्षापासुन सुरू केला आहे. या कामगार भरतीत जुन्या कामगारांना डावलुन व्यवस्थापनाने आमच्यावर अन्याय केला आहे. असे भाऊ ठाकुर आणि बी जी गायकवाड या कामगारांनी सांगितले.

Web Title: Marathi news Konkan news Jaysinth company employee strike