भाताच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल

लक्ष्मण डुबे
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

दरम्यान परीसरात अजुनही खराब हवामान असल्याने इतर सर्व शेतकरी धास्तावले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाच्या वर्षी पिकांना चांगलाचं बसत असल्याने शेतकरी पुरतेच हतबल झाले आहे. 

रसायनी (रायगड) : रसायनीतील मोहोपाडा परीसरात शेतकऱ्यांच्या दुबारा भाताच्या पिकावर खराब हवामानामुळे खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

दरम्यान परीसरात अजुनही खराब हवामान असल्याने इतर सर्व शेतकरी धास्तावले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाच्या वर्षी पिकांना चांगलाचं बसत असल्याने शेतकरी पुरतेच हतबल झाले आहे. 

रसायनी पाताळगंगा परीसरातील सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबारा भाताचे व भाजी पाल्याचे पिक घेत आहे. मोहोपाडा येथील शेतकऱ्यांनी लावणी केलेल्या भाताच्या पिकावर खोडकिडा रोग पडला आहे. त्यामुळे शेतकरी काळजीत पडले आहे. या खराब हवामानामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किटक नाशक औषधांची फवारणी केली आणि रासायनीक खत टाकली, मात्र खराब हवामान असल्याने रोग फारसा आटोक्यात आला नाही. असे वामन दळवी व इतर शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या खराब हवामानाचा फटका भात पिका बरोबरच  भाज्यांचे पिक आणि आंब्याच्या मोहोराला बसला आहे. असे बाळु कातकरी मळेवाला यांने सांगितले. 

Web Title: Marathi news Konkan news rice crop