अादिवासी विदयार्थी गिरवू लागले टॅबवर शिक्षणाचे धडे

education
education

पाली : सुधागड तालुक्यातील पडसरे आश्रमशाळेतील मुले टॅबवर शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. या अादिवासी विदयार्थ्यांना मुंबई येथील शापूरजी पालनजी फौंडेशन यांच्या वतीने प्रथम शिक्षण उपक्रम यांच्या मार्फत नुकतेच टॅबचे वाटप करण्यात आले अाहे.

पुस्तक अाणि वहीपेक्षा आता हे अादिवासी विदयार्थी हातातील टॅबच्या माध्यमातून ज्ञानकण गिरविणे पसंत करत आहेत असे संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता सावंत यांनी सकाळला सांगितले.

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची डिजिटल पद्दतीने ओळख व्हावी, त्यांना शिक्षणात अावड व गोडी लागावी हा यामागील उद्देश आहे.अाश्रमशाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गासाठी पाच असे टॅब देण्यात आले अाहेत. शापूरजी पालनजी फौंडेशनतर्फे आश्रमशाळेला आवश्यक असलेल्या सर्व भौतिक सोयी सूविधा आता पर्यंत दिल्या आहेत. आश्रमशाळेच्या विकासात या फौन्डेशनचे मोठे योगदान अाहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com