पाताळगंगा नदीवर दुसऱ्या पुलाचे काम सुरू

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 20 मार्च 2018

रसायनी (रायगड) - पाताळगंगा नदीवर जुन्या पुलाला खेटुन दुसऱ्या पुलाचे बांधकाम एमआयडीसीने सुरू केले आहे. ठेकेदाराला परवानगी मिळाली होती. दोन महिने उलटले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नसल्यामुळे कारखानदार आणि नागरिक नाराजी व्यक्त करत होते. पुलाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे या बाबतची सकाळने 26 फेब्रुवरी रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. 

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या पराडे ते सिध्देश्वरी या मुख्य रस्त्यावर पाताळगंगा व अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात तसेच वडगाव, इसांबे, माझगाव, चावणा, जांभिवली, कराडे खुर्द या ग्रामपचायतीच्या हाद्दीतील गावांकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीचा ताण पडू लागला होता. एमआयडीसीने या रस्त्याचे मजबूतीकरण व रूंदीकरणांचे काम जून 2015 मध्ये पूर्ण केले आणि रस्ता वाहतुकीस खुल्ला केला आहे. मात्र मार्गावरील पाताळगंगा नदी वरील पुलाचे बांधकाम रखडले गेले होते. दुस-या पुलाचे बांधकाम करण्यात यावे आशी मागणी पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशने सातत्याने सुरू ठेवली होती. तसेच सकाळने वेळोवेळी प्रसिद्ध दिली. 

ठेकेदाराला परवानगी मिळवून दोन महिने उलटले मात्र बांधकामाला सुरूवात झाली नाही. ठेकेदारांनी नदीच्या तिरावर शेड बांधुन सामान आणुन ठेवले होते. प्रत्यक्षात बांधकामास केव्हा सुरवात होणार आशी चर्चा कारखानदांर आणि नागरिक करत होते. 

दरम्यान, आता कामाला सुमारे पंधरा दिवसापुर्वी सुरवात झाली असल्याने कारखानदार आणि नागरिक समाधान व्यक्त करत आहे. तसेच पुलाचे काम सुरू झाले असले तरी यंदाच्या वर्षीही पावसाळ्यात सध्याच्या पुलावरून जाताना वहान चालकांना हाल सहन करावे लागणार आहे. मात्र काम वेळेत पुर्ण झाले तर पुढील वर्षी जाताना प्रवास सुखकारक होईल. पावणे तीन वर्षापासून पूल बांधण्याचे काम रखडले आहे. आता कामाला सुरवात झाली आहे. पावसळ्यापुर्वी नदीतील महत्वाचे काम झाले तर पुढील काम करणे सोईचे होईल असे कारखानदारांकडुन सांगण्यात आले.

Web Title: marathi news konkan patalganga river bridge