रायगड फेवरेट डेस्टिनेशन, नाताळाच्या सुट्टीत जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळे पर्यटकांनी व भाविकांनी बहरली,

 अमित गवळे 
रविवार, 24 डिसेंबर 2017

पाली : सलग तीन दिवस लागून अालेल्या सुट्टया अाणि नाताळ यामुळे पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांवर गर्दी केली. शनिवार (ता.२३) पासूनच जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे. येथील समुद्र किनारे, मंदिरे, एेतिहासिक वास्तू, किल्ले, धार्मिक स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे. राहण्या-खाण्याच्या दरावर जीएसटीचा परिणाम झाला आहे. पर्यटक दर्याच्या खजिन्यावर म्हणजेच मच्छिवर यथेच्छ ताव मारत आहेत.

समुद्र किनार्‍यांवर गर्दी

रायगड जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. त्यामध्ये अलिबाग- नागाव, अाक्षी, रेवस, वरसोली, मुरुड-काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्वर, अादगाव येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. सर्वच किनार्‍यांवर बोटिंग, घोडागाडी, बाईक राईडची मजा पर्यटक लुटत आहेत.

नाताळ आणि काही दिवसांवर येऊ घातलेले वर्ष अखेर यामुळे किनार्‍यावर जल्लोष करण्यासाठी पर्यटकांनी येथे तळ ठोकला आहे.  

सर्वच ठिकाणची बुकींग फुल्ल झाली असली तरी देखील काही हॉटेल व कॉटेजमध्ये एेनवेळी येणार्‍या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही हॉटेलामध्ये नाताळ व थर्टीफस्टच्या पार्टीसाठी खास सुट व आकर्षक ऑफर दिल्या आहेत.ज्यामध्ये राहणे व खाण्यासाठी विशेष कुपनची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: marathi news local raigad news weekend