गणपतीपुळ्यात जीवरक्षकाने वाचविले पर्यटकाचे प्राण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या एका पर्यटकाला किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचविले. ही घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळला आहे. लाटांचा जोर वाढल्याने त्यात पर्यटक सापडला होता.

या प्रकरणाची नोंद गणपतीपुळे पोलिस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे. 

अवधूत सर्जेराव माणके (वय 25, रा. सांगली) असे त्या पर्यटकाचे नाव आहे. माणके कुटुंबीय सांगली येथून फिरण्यासाठी गणपतीपुळ्यात आले होते. गणपतीचे दर्शन झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यातील सहा ते सातजणं पोहण्यासाठी समुद्रात उतरले.

गेले दोन दिवस समुद्र खवळलेला आहे. उंच लाटा किनाऱ्यावर आपटत आहे.

मंदिरासमोरील भाग थोडा खोलगट झाला असल्याने तेथील वाळू वेगाने समुद्राच्या दिशेने सरकते. पोहण्याच्या नादात अवधूतही याच लाटांमध्ये अडकला. त्याला बाहेर पडता येत नव्हते. त्याच्या बरोबरच्या लोकांनी लगेच आरडाओरडा केली. किनाऱ्यावर असलेले जीवरक्षक राज देवरुखकर आणि सुरेश पवार यांनी अवधूतला पाण्यातून बाहेर काढले. त्याच्या पोटातील पाणी काढण्यात आले. त्याला उपचारासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अवधूत सुरक्षित असल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Web Title: marathi news marathi website Kolhapur News sangli news Ganpatipule