तेलींसोबत राहून मोठे होता येणार नाही : संजू परब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी : राजन तेली हे अर्धवट माहितीवर खोटे दावे करत आहेत. त्यामुळे सावंतवाडी भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये, त्यांच्या सोबत राहून ते कधीही मोठे होणार नाहीत हा इतिहास आहे, अशी टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

नारायण राणे यांच्यावर टिका करणार्‍या विक्रांत सावंत यांचे वय विटी दांडू खेळण्याचे आहे. आमच्या पॅनेलची त्यांनी काळजी करू नये, आम्ही आमचे 35 हुन जास्त सरपंच बसविणार आहोत. त्यानंतर त्यांना मी विटी दांडू बक्षिस देईन, असेही श्री. परब यांनी सांगितले.

श्री. परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेवून आपल्यासह राणे यांच्यावर टिका करणार्‍यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी पंचायत समिती सदस्य उन्नती धुरी, नगरसेवक उदय नाईक, केतन आजगावकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. परब म्हणाले,“काल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तेली यांनी समर्थ पॅनेलने पंधरा ठिकाणी उमेदवार उभे केले, नाही असा दावा केला होता; मात्र त्यांना देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. आमच्याकडे पुरावे आहेत आणि विजयानंतर ते आम्ही निश्‍चितच उघड करू. श्री. तेली यांच्या सोबत जी शंभर किलोची दोन माणसे आहेत त्यांच्याकडुन चुकीची माहिती दिली जात आहे; मात्र त्याचा फायदा पक्षाला होणार नाही. अर्धवट माहितीच्या आधारे तेली खोटे बोलत आहेत, त्यामुळे सावंतवाडी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीतून आलेले पार्सल पुन्हा पाठवून द्यावे आणि स्वतः लढा द्यावा. तेलींना यापुर्वी विधानसभा निवडणुकीत नाकारले आहे. त्यामुळे पुन्हा काही झाले तरी त्यांच्या पाठिशी लोक राहणार नाही.”

शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी त्यांच्यासह राणेंवर टिका केली होती. त्याला श्री. परब यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “श्री. सावंत यांचे राजकीय वय लक्षात घेता त्यांनी थेट राणेंवर टिका करणे चुकीचे आहे. मुल जन्माला येण्यापुर्वी तब्बल नऊ महीने ते पोटात वाढावे लागते. सावंत यांचे राजकीय वय सहा महीन्याचे आहे. त्यामुळे त्यांनी थेट आमच्या नेत्यावर टिका करण्यापेक्षा विटी दांडू खेळावा. वायफळ बडबड करू, नये आणि येणार्‍या ग्रामपंचायत निवडणुका समर्थ पॅनलची काळजी त्यांनी करू नये. आमचे तब्बल 35 ठिकाणी सरपंच बसणार आहेत. त्यानंतर मी त्यांना विटी दांडू भेट देणार आहे. तो वेर्ले येथे बनवायला दिला आहे. असा टोला श्री. परब यांनी लगावला.

विक्रांत यांनी संस्कृतीच्या गोष्टी सांगू नये. राणेंच्या पॅनलमध्ये उभे राहील्याचे कारण पुढे करुन मडुर्‍यातील दोघांना शाळेतून काढुन टाकण्यात आले ही त्यांची कुठची संस्कृती याचे उत्तर द्यावे, असा आरोपही त्यांनी केला. 

राजकारण नको सिनेमात जा
ते पुढे म्हणाले, “विक्रांत यांचे राजकीय योगदान काय?  त्यांच्या वडीलांनी कधी आपल्या वडीलांच्या नावाने राजकारण केले नाही; मात्र नातू आता आजोबांचे नाव सांगुन राजकारण करीत आहे. त्यांचे हे राजकारण करण्याचे वय नाही. ते हजारो रुपयाचे बुट कपडे घालतात, आलीशान गाड्यातून फिरतात, सुंदर दिसतात, त्यामुळे त्यांनी राजकारण न करता सिनेमात कलाकार म्हणून काम करावे.”

Web Title: marathi news marathi websites Kokan News Narayan Rane