सुधागड तालुक्यात राबगावमध्ये गुरांचा गोठा कोसळला

अमित गवळे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पाली : परतीच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात शेतीसह घरे व गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अाहे. सुधागड तालुक्यात राबगाव येथे रविवारी (ता.८) सायंकाळी गुरांचा गोठा कोसळला.गोठ्यातील वासे व कौले अंगावर पडल्याने गोठ्याचे मालक गंभीर जखमी झाले. तर गोठ्यातील तीन गुरांना देखिल गंभीर दुखापत झाली.

गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुडगूस घातला आहे. विजांचा कडकडाट,ढगांचा गडगडाट, जोरदार वादळवारा. यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी झाडे कोसळण्याबरोबरच घराचे पत्रे व कौले फुटण्याच्या घटना झाल्या आहेत. राबगाव येथील विठोबा नावजी भोईर यांचा राबगाव ग्रामपंचायती शेजारी गुरांचा गोठा आहे. रविवारी संध्याकाळी विठोबा भोईर हे गुरांना रानातून चरवून आणून पुन्हा गोठ्यात बांधण्यासाठी आले होते. यावेळी अचानकपणे गोठा कोसळला. गोठ्याची वासे व कौले विठोबा भोईर यांच्या अंगावर पडली. ते ढिगार्‍यात अडकून पडले होते.त्यांच्या ओरडण्याच्या आवाज ऐंकून आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी मदतीकरीता धावून आले. त्यांनी जखमी भोईर यांच्यासह गोठ्यातील 6 गुरांना बाहेर काढले.

विठोबा भोईर यांना उपचाराकरीता तातडीने पालीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत तीन गुरे जखमी झाली. या घटनेची खबर मिळताच महसूल प्रशासनाचे कर्मचारी व तलाठी नंदकुमार हिंदोळे यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.शासनाकडू लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भोईर यांनी केली आहे.

Web Title: marathi news marathi websites Pali News Raigad News Monsoon