वादळी पावसामुळे सुधागडमध्ये वीजपुरवठा खंडीत

अमित गवळे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पाली : जिल्ह्यासह सुधागड तालुक्यासदेखील परतीच्या वादळी पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वारा, विजा व पावसामुळे वीजवितरणचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

वादळी वारा, विजा व मुसळधार पावसामुळे बहुतांश ठिकाणी विजेच्या तारांवर व खांबांवर झाडे पडली आहेत; तर विजेच खांब कोलमडले अाहेत. अनेक ठिकाणचे ट्रान्सफार्मर व फिडर बंद पडले आहेत. शुक्रवारपासून तालुक्यातील उन्हेर, नांदगाव, मानखोरे, पाच्छापुर, कवेले, दहिगाव या भागातील वीजपुरवठा एक दोन दिवस खंडीत होता.

महावितरणने रविवार व सोमवारी उन्हेरे, नांदगाव, कवेल भागांचा वीजपुरवठा सुरु केला. अजुनही काही गावांचा विजपुरवठा सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून.मोठ्या लाईन दुरुस्त केल्या आहेत. बंद असलेल्या छोट्या लाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु अाहे. फिडर व ट्रान्सफाॅर्मर बसविले जात आहेत, असे पाली वीज वितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता मुकेश गजभिये यांनी 'सकाळ'ला सांगितले.

पाऊस कमी होत नसल्याने वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.

वादळी वारा, विजा व मुसळधार पावसामुळे काम करतांना अनेक अडचणी येत आहेत. अनेक धोके सुद्धा निर्माण होतात. तरी सुद्धा अामचे सर्व कर्मचारी जिवावर उदार होऊन काम करुन विज पुरवठा सुरळीत करीत आहेत. अशा वेळी रविवारी सुट्टीच्या दिवशी अाणि रात्री सुद्धा अाम्ही काम करतो.

इंटरनेट अाणि मोबाईल सेवेवरही परिणाम
वादळी वारा व पावसामुळे दोन तीन दिवसांपासून मोबाईल नेटवर्कवरही परिणाम झाला आहे. इंटरनेट सेवा संथ गतीने सुरु आहे. बीएसएनएलची इंटरनेट सेवा शनिवारी पूर्णपणे ठप्प झाली होती. सोमवारी पावणे अकरानंतर बीएसएनएलचे नेटवर्क पूर्ववत झाले. तोपर्यंत बँकिंग व्यवहार ठप्प झाले होते.

Web Title: marathi news marathi websites Raigad News Monsoon Sudhagad Rains