राजिप शाळा पायरीचीवाडी शाळेतील विदयार्थ्यांनी केला सुधागड सर

अमित गवळे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पाली : सुधागड तालुक्यातील रा.जि.प.शाळा पायरीचीवाडी शाळेतील विदयार्थ्यांची परिसर सहल गुरुवारी (ता३२८) 'सुधागड किल्ला' येथे नेण्यात आली. विदयार्थ्याची फार दिवसांची सुधागड किल्ला पाहण्याची इच्छा शाळेचे सह. शिक्षक कुणाल पवार यांनी पूर्ण केली. किल्यावर असलेले भोराई माता मंदिर, महादरवाजा, वाडा अादी एेतिहासिक वास्तुंची माहिती व महत्त्व सांगितले. दऱ्या-खोऱ्या, चोरवाटा, टकमक टोक, नैसर्गिक सौदंर्य अादिंचा प्रत्यक्ष अनुभव विदयार्थ्यांनी घेतला.

किल्ला नक्की कसा असतो? किल्ल्यावर काय काय असते? पुस्तकात वाचलेले प्रसंग, घटना, ठिकाण नक्की कसे असतात? या बाबत पायरीच्या वाडीतील विदयार्थ्यांमध्ये खूप जिज्ञासा व उत्सुकता होती. अाम्हाला सुधागड किल्ला पहायचा आहे. आमचे मम्मी-पप्पा आम्ही लहान असल्यामुळे पाठवत नाही. त्यांना तुम्ही सांगितले तर ते अाम्हाला तुमच्या सोबत पाठवतील. अशी मागणी शाळेतील लहानग्यांनी शाळेचे सह. शिक्षक कुणाल पवार यांच्याकडे केली. त्यांनीदेखील विदयार्थ्यांना गडकिल्यांची माहिती व्हावी, एेतिहासिक महत्त्व कळावे तसेच प्रत्यक्ष अनुभवातून विदयार्थ्यांच्या अभ्यासाशी निगडित गोष्टि समजाव्यात यासाठी विदयार्थ्यांचा हा हट्ट पुरविण्याचे ठरविले.

पालकांची परवानगी मिळवून त्यांनादेखील सोबत घेत काही माजी विदयार्थ्यांसह सुद्धा सुधागड किल्ला सर केला. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता कुडाळी यांनी संमती दिली. किल्ला चढतांना वाटेत लागलेला महादरवाजा पाहून विदयार्थ्यांना प्रश्न पडला दरवाजा बांधण्यासाठी एवढे मोठे दगड कसे अाणले असतील? एवढे मोठे बांधकाम कसे केले असावे? असे प्रश्न केले.

टकमक टोकावरुन येणारा प्रतिध्वनी एेकून मुले स्तिमित झाली. अनेक जण अापल्या मित्रांची नावे घेवून हाका मारु लागली. तर पायरीची वाडी शाळेचा विजय असो असा अावाज देऊ लागली. याची सर्व शास्त्रीय माहिती शिक्षक कुणाल पवार यांनी दिली. मुलांनी चोरवाटेतून जावून प्रत्यक्ष अनुभव घेतला. दुपारी भोराई देवीचे दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर कोठार, घरांचे अवशेष मंदिर अादि वास्तू पाहिल्या. उंचावरुन द-याखोर्या, धबधबे अादी निसर्गाच्या विविध रुपांचा अनुभव विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला. त्यामुळे विदयार्थी खूप अानंदी अाणि उत्साहीत झाले होते.

पुस्तकात वाचलेल्या खुप गोष्टिंचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी विदयार्थ्यांनी घेतला. त्यामुळे अध्ययना बरोबरच मनोरंजन देखिल झाले. अनेक एैतिहासिक व नैसर्गिक गोष्टिंची त्यांना सखोल माहिती झाली. विदयार्थ्याची शक्ती व उत्साह पाहून खूप थक्क झालो. हा अनुभव खूप अवर्णनीय व अविस्मरणीय होता.
- कुणाल पवार, सह. शिक्षक, राजिप शाळा पायरीचीवाडी

Web Title: marathi news marathi websites Raigad News Sudhagad trek