बिदागीपेक्षा कला महत्त्वाची; पांगुळबैल सिंधुदुर्गात

अमोल टेंबकर
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

सावंतवाडी : बिदागीपेक्षा कला महत्वाची कला आहे; पण आता त्यात पैसा मिळत नाही. त्यामुळे पोर फिरायला बघत नाहीत. तरीही कला जिवंत राहिली पाहिजे आणि चार पैसे बी मिळतील.. लोकांचे मनोरंजनसुद्धा व्हयील म्हणून फिरतोय, असे सांगणार्‍या शिर्डी येथील गोडे कुटुंबियांनी मोठ्या शिगांच्या पांगुळ बैलाला घेऊन ऐन चतुर्थीत सिंधुदुर्गात प्रवास सुरू केला आहे.

आमचा बैल अहमदाबादी आहे. तो अनेक कवायती करुन दाखवतो; मात्र त्याला पाहिल्यानंतर लोक लाकडाची शिंगे लावली आहेत म्हणून सांगतात; मात्र खात्री केल्यानंतर ती खरी असल्याचे लक्षात आल्यानंतर खुश होतात. त्यामुळे आत्मिक समाधान मिळते. शेवटी काय पोटाची खळगी भरण्यासाठी सारे काही सोसलं पाहिजे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

ऐन गणेश चतुर्थीच्या हंगामात शिर्डी येथील गोडे कुटुंबातील सत्तरी गाठलेले महादेव गोडे हे आपल्या सहकार्‍यांसमवेत लोकांचे मनोरंजन करण्याबरोबर पोटाची खळगी भरण्यासाठी सिंधुदुर्गात आले आहेत. दरवर्षी आपण चतुर्थीच्या हंगामात या ठिकाणी येतो आणि लोकांचे मनोरंजन करुन चार पैसे कमवितो असे ते सांगतात.

ते म्हणाले,“बैल घेवून लोकांचे मनोरंजन करणे ही आपल्या पूर्वजांपासून चालणारी कला आहे. माझे वय आज सत्तर असूनसुद्धा मी ती चालवित आहे; मात्र आता यात पैसे काही मिळत नाहीत. त्यामुळे पोरं आता काम करायला तयार नाहीत. पूर्वी शिर्डीतून चालत बैल घेऊन या ठिकाणी यायचो. आता शक्य होत नाही. त्यामुळे गाडीत घालून बैल घेऊन येतो आणि या ठिकाणी चार ते पाच दिवस फिरतो. त्यात मिळालेल्या बिदागीत समाधान मानतो.”

गोडे पुढे म्हणाले, “आमच्याकडे असलेला बैल हा अहमदाबादी आहे. त्याच्याकडून कवायतीचे प्रकार करुन घेतले जातात. तो नृत्य करतो, मान हलवून दाखवतो. त्याचबरोबर मांडीवर पाय ठेवून उभा राहतो. त्यामुळे लोकांचे मनोरंजन होते. त्यात खूश होऊन लोक पैसे देतात. ही कला अशीच पुढे राहणे गरजेचे आहे; मात्र लोक तांदूळ, गहू तसेच अन्य खाण्याचे साहित्य देतात. त्यात काही पैसे घालून बैलाचा खर्च भागवतो.

Web Title: marathi news marathi websites Sawantwadi Ratnagiri News