अादिवासी विद्यार्थ्यांची बाॅक्सिंग, अॅथेलेटिक्समध्ये चमक

अमित गवळे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पाली : कुलाबा जिल्हा अादिवासी सेवा मंडळ संचालित अनुदानित माध्यमिक अाश्रमशाळा पडसरेच्या विदयार्थ्यांनी बाॅक्सिंग अाणि अॅथेलेटिक्समध्ये चमक दाखविली आहे. भरत घुटे व व चंद्रकांत बरतड या दोन विद्यार्थ्यांची निवड क्रीडा प्रबोधिनीत झाली आहे.

पाली : कुलाबा जिल्हा अादिवासी सेवा मंडळ संचालित अनुदानित माध्यमिक अाश्रमशाळा पडसरेच्या विदयार्थ्यांनी बाॅक्सिंग अाणि अॅथेलेटिक्समध्ये चमक दाखविली आहे. भरत घुटे व व चंद्रकांत बरतड या दोन विद्यार्थ्यांची निवड क्रीडा प्रबोधिनीत झाली आहे.

तसेच नुकत्याच अलिबाग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रायगड संघाच्या कुमार गटातून अाश्रमशाळेच्या अाकाश महादू शिंदे या विद्यार्थ्यानेही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिव छत्रपती क्रीडापीठ बालेवाडी, पुणे अंतर्गत सन २०१७-१८ च्या प्रवेशासाठी अायोजित केलेल्या बॅटरी ऑफ टेस्टची निवड चाचणी झाली होती. या निवड चाचणीत उत्तम यश संपादन केल्याने भरत बबन घुटे या विद्यार्थ्याची बाॅक्सिंगसाठी क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे निवड झाली. तर चंद्रकांत किसन बरतड या विदयार्थ्याची अॅथेलेटिक्स या क्रीडाप्रकारासाठी क्रीडा प्रबोधिनी ठाणे येथे निवड झाली आहे.

या निवड चाचण्या तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पार पाडल्या जातात. या खडतर चाचण्यांमधून उमेदवारांची निवड होते. या विदयार्थ्यांच्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल संस्थेचे संचालक रविंद्र लिमये तसेच शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी ढोपे व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सरिता सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.

विदयार्थ्यांच्या उत्तम कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात अाणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असे त्यांनी सांगितले. अाश्रमशाळेतून भविष्यात देशासाठी उत्तम खेळाडू तयार होतील अशा सार्थ अभिमान अाम्हाला वाटतो असे मुख्याध्यापिका मिनाक्षी ढोपे म्हणाल्या. या होतकरु विदयार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

शाळेतील विदयार्थ्यांची यशस्वी घौडदौड
अात्तापर्यंत अाश्रमशाळेतील विदयार्थी क्रिडाप्रबोधिनी, पुणे,  क्रिडाप्रबोधिनी, नाशिक, एकलव्य रेसिडेंन्शिअल स्कुल, ठाणे, पब्लिक स्कुल, ठाणे अशा मोठ्या संस्थांमध्ये शिक्षण घेत अाहेत अाश्रमशाळेचे नाव उंचावित आहेत.

Web Title: marathi news marathi websites Sports News Sudhagad News