ग्रामीण जनतेला मिळाला स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षमीकरणाचा प्रकाश

अमित गवळे
सोमवार, 12 मार्च 2018

पाली (रायगड) : ग्रामीण भागातील जनतेचे स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी मुंबईतील काही समाजसेवी संघटना पुढे आल्या आहेत. शनिवारी (ता.10) व रविवारी (ता.11) सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटी, भेरव येथील क्लब हाऊस हॉलमध्ये सौरदिवे निर्मितीचे दोन दिवशीय मोफत कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत भेरव, वाघोशी व आजुबाजूच्या गावातील जवळपास 200 -250 लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. इनर व्हील क्लब, मुंबई आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई कोस्टलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वसुधा सोसायटीच्या सहकार्याने ही कार्यशाळा घेण्यात आली.    

पाण्याची एक लिटरची रिकामी बाटली, एलईडी बल्ब, सोलर पॅनल, छोटी बॅटरी, सेलोटेप आणि बटण आदि साहित्य वापरुन रीचार्जेबल सौरउर्जेवर चालणारे दिवे बनविण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. जिथे विजेची व्यवस्था नाही किंवा रात्री अपरात्री बाहेर जाण्यासाठी या सौरदिव्यांचा वापर होऊ शकतो. उपस्थित काही प्रशिक्षणार्थीना जवळपास शंभरहुन अधिक सौरदिवे बनविण्यासाठी लागणारे साहित्य मोफत देण्यात आले. या कार्यशाळेत विविध गावातील ग्रामस्त तसेच लक्ष्मी पात्रो, डॉ. कपिला गुप्ता, डॉ. माधवी पंड्या, पॅट्रीशिया हिल्टन, हेमा सूर्यनारायणन, अलमित्रा पार्थ टिंबाडिया या पदाधिकर्यांसह ललित ठोंबरे व अमित निंबाळकर उपस्थित होते.

या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे सौरदिवे बनविण्यास तयार असणाऱ्या ग्रामस्थांना 100 ते 150 रुपयांचे प्रति सौरदिव्याचे साहित्य विकत दिले जाईल. आणि हा 100 ते 150 रुपयात बनवलेला सौरदिवा संस्था 200 रुपयांत विकत घेऊन ते गरीबांना मोफत वाटणार आहे. यामुळे गावकार्यांना देखील हक्काचा स्वयंरोजगार मिळणार आहे.

Web Title: Marathi news pali news raigad rural area self employment strong