पाताळगंगावरुन होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा अकरा तास बंद 

लक्ष्मण डुबे 
सोमवार, 29 जानेवारी 2018

रसायनी (रायगड) - पाताळगंगा नदी वरील एमआयडीसी उदंचन केंद्राचा विज पुरवठा रविवार (ता. 28) रोजी बंद पडला होता. त्यामुळे एमआयडीसी मार्फत मोहोपाडा आणि कैरे येथील जलशुध्दीकरण केंद्रातून कारखाने आणि गावांचा पाणी पुरवठा अकरा तास विस्कळीत झाला होता. त्यामुळे कारखानदार आणि गावांतील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड दयावे लागले.

एमआयडीसीच्या कैरे येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाताळगंगा व अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रारातील कारखाने तसेच वडगाव, जांभिवली, चावणा, कराडे खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुमारे पंधरा गाव आणि मोहोपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्रातून एचओसी, एचआयएल, लोना इंडस्ट्रीज आदी रसायनीतील कारखाने तसेच मोहोपाडा, चांभार्ली, बारवाई, पोयंजे, कोन, पळस्पे, भिंगार, शिरढोण आदी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पस्तीसहुन जास्त गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. उदंचन केंद्राचा विज पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे रविवार पहाटे चार ते दुपारी तीन वाजेपर्यंत असा अकरा तास बंद पडला होता. त्यामुळे कैरे आणि मोहोपाडा येथील केंद्रातून कारखाने व गावांना होणारा पाणी पुरवठा अकरा तास बंद पडल्याने कारखानदार आणि नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले. दुपारी तीन वाजता उदंचन केंद्रातील पंप सुरु झाले. त्यानंतर पाणी पुरवठा हळूहळू पुर्ववत झाला. दहा वाजता काही वेळ विज पुरवठा सुरु झाला. मात्र पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी त्याचा फायदा झाला नाही, असे सांगण्यात आले.

Web Title: marathi news patalganga river midc water supply off