कोथिंबीर आणि मेथी झाली स्वत

अमित गवळे
बुधवार, 6 डिसेंबर 2017

पाली : सध्या कोथिंबीर आणि मेथीचे पीक जोमात आले आहे. त्यामुळे पुणे आणि नवी मुंबई भाजी मंडईत कोथिंबीर आणि मेथी या दोन भाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात सर्वत्र अगदी पाच व दहा रुपयांमध्ये जुडी मिळत आहे. त्यामुळे ग्राहक या भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. या दोन भाज्या सोडल्या तर बाजारात इतर भाज्यांच्या किंमती मात्र वधारल्या आहेत. घरात मुबलक प्रमाणात मेथी आणि कोथिंबीर उपलब्ध होत असल्याने मेथीचे पराठे कोथिंबीरच्या वडया असे विविध पदार्थांचे बेत केले जात आहेत. त्यामुळे खवय्यांची सुद्धा चांगलीच चंगळ होत आहे. या भाज्या नाशवंत असल्याने लवकर खराब होतात. तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

पाली : सध्या कोथिंबीर आणि मेथीचे पीक जोमात आले आहे. त्यामुळे पुणे आणि नवी मुंबई भाजी मंडईत कोथिंबीर आणि मेथी या दोन भाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात सर्वत्र अगदी पाच व दहा रुपयांमध्ये जुडी मिळत आहे. त्यामुळे ग्राहक या भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. या दोन भाज्या सोडल्या तर बाजारात इतर भाज्यांच्या किंमती मात्र वधारल्या आहेत. घरात मुबलक प्रमाणात मेथी आणि कोथिंबीर उपलब्ध होत असल्याने मेथीचे पराठे कोथिंबीरच्या वडया असे विविध पदार्थांचे बेत केले जात आहेत. त्यामुळे खवय्यांची सुद्धा चांगलीच चंगळ होत आहे. या भाज्या नाशवंत असल्याने लवकर खराब होतात. तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना अगदी अत्यल्प दरात त्या विकाव्या लागत आहेत. 

स्वस्त दरात मिळत असल्याने घरात कोथिंबीर आणि मेथी या भाज्या खूप आहेत. मग या पासून पराठे आणि भाज्या आदी पदार्थ बनविते. मोठ्यांसह लहानगे देखील आवडीने हे पदार्थ खातात. त्यामुळे पौष्टिक अन्नघटक त्यांच्या पोटात जातात. अशी गृहिणी प्रतिक्रीया मेघना निंबाळकर यांनी दिली.

Web Title: Marathi news price of vegetables get decrease

टॅग्स