सरावादरम्यान महिला कॉन्स्टेबलसह प्रशिक्षक जखमी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

नेमबाजीच्या सरावादरम्यान तीन महिला कॉन्स्टेबलसह त्यांचे प्रशिक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

अलिबाग (रायगड) : अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील गोळीबार मैदानावर नेमबाजीच्या सरावादरम्यान तीन महिला कॉन्स्टेबलसह त्यांचे प्रशिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. मैदानावर नेमबाजीचा सराव करताना ही गंभीर घटना घडल्याचे कळते. यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आल्याचे समजते.   

या घटनेत नीलम थोरवे (वय 25 रा. कर्जत), सुरेखा बावधने (वय 23 रा. नायगाव, दादर), स्वप्नाली आमटे (वय 23 रा. घाटकोपर) अशी जखमी महिला कॉन्स्टेबलची नावे असून, त्यांचे प्रशिक्षक रवींद्र मदने (वय 44 रा. खांदा कॉलनी, पनवेल) हेही गंभीर जखमी असल्याचे कळते.  

Web Title: Marathi news raigad news alibaag 3 ladies constable and trainer injured shooting practice