अादिवासी मुलीने दिले निराधार भेकराच्या पिल्लाला नवे अायुष्य

अमित गवळे
सोमवार, 15 जानेवारी 2018

भेकर (Barking deer) हे हरणांच्या सारंग कुळातील प्राणी आहे. परंतु या कुळातील हरणासारखे त्याला शिंगे नसतात. त्याच्या आवाजावरून त्याला भुंकणारे हरीण असेही नाव आहे. पुर्णवाढ झालेले भेकराची लांबी साधारणतः १०० ते ११० सेंमी पर्यंत व उंची ४० ते ४५ सेंमी अाणि वजन वजन साधारणतः २५ किलो असते. हे अतिशय लाजाळू असते. घनदाट जंगलामध्ये व प्रामुख्याने पाण्याजवळ आढळते.
- राम मुंढे, स्थानिक वन्यजीव अभ्यासक

पाली : जंगलात एका करवंदाच्या जाळीत अडकुन पडलेल्या निराधार भेकराच्या पिल्लाला एका अादिवासी मुलीने नवे अायुष्य दिले आहे. माणगाव तालुक्यातील पाटणूस गावाजवळील फणसीदांड अादिवासी वाडीत राहणारी निशा बारकू पवार हि शाळकरी मुलगी एका भेकराच्या पिल्लाचा अात्मियतेने सांभाळ करत अाहे. हे लहानगे पिल्लू देखिल तिच्याकडे अापल्या थोरल्या बहिनी प्रमाणचे निर्धास्त राहत आहे.

निशा हि पाटणूस गावातील कुंडलिका विदयालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. अडिच महिन्यापुर्वी तिचे वडील अापल्या काही सहकर्यांसोबत जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एका करवंदाच्या जाळीत भेकराचे अगदी लहान पिल्लू अडकलेले दिसले. त्याच्या अाजुबाजुला त्याची आई किंवा दुसरे कोणतेच प्राणी नव्हते. त्यामुळे या पिल्लाचा जिव धोक्यात होता. परिणामी या निराधार लहानग्याला इतर हिंस्त्र प्राण्यांपासून वाचविण्यासाठी जाळीतून सोडवून ते त्याला अापल्या घरी घेवून अाले. या छोट्या पिल्लाला पाहुन निशा खुप अानंदी झाली. तेव्हा पासून ती त्याचा अगदी अाईप्रमाणे सांभाळ करत आहे. अापल्याकडील गाईचे दुध बाटलीद्वारे त्याला पाजत आहे. ते पिल्लू देखिल तिच्या अंगाखांद्यावर खेळेत, तिच्या मागेमागे घरात बागडते.दोघांमध्ये अगदी घट्ट नाते जुळले आहे. त्याला दुधाबरोबर बोरीचा व इतर पाला देखिल खाऊ घातला जात आहे. 

या पिल्लाची प्रकृती सुद्धा ठणठणीत असून वाढ देखिल चांगली होत आहे. निशाने या पिल्लासाठी घरात एका स्वतंत्र खोलीत खास सुरक्षित जागा केली आहे. निशा शाळेत गेल्यावर तिची अाजी डोळ्यात तेल घालुन या भेकराच्या पिल्लाची काळजी घेते. तसेच इतर कुत्रे व व मांजरांपासून देखिल संरक्षण करते.निशाच्या शाळेतील व अाजुबाजूच्या मुलांना देखिल या भेकराचा खुप लळा लागला आहे. त्याला बघण्यासाठी ते निशाच्या घरासमोर गर्दी करतात.अादिवासी मुलांना जर अशा प्रकारे लहानपणापासून वन्य प्राण्यांचा लळा व माया लागल्यास कदाचित पुढे ते शिकारीपासून लांब जातील.

निशाने सकाळला सांगितले की या पिल्लाचा खुप लळा लागला आहे.तरीसुद्धा पिल्लू अजुन थोडे मोठे झाल्यावर मी त्याला जंगलात मुक्त संचारासाठी सोडणार आहे. किंवा वनविभागाच्या स्वाधीन करेन जेणेकरुन या पिल्लाचे संवर्धन व रक्षण होईल. जंगली प्राणी व माणसाची हि मैत्री पाहून खरच सर्वांना अाश्चर्य होत आहे.

अशा क्वचित प्रसंगी जर जंगली प्राण्यावर तशी वेळ आली तर त्याला काही दिवस पाळण्यास हरकत नाही. मात्र नंतर तो पूर्णपणे बरा झाला व मोठा झाला कि त्याला जंगलात सोडून द्यावे. त्याला सोडतांना मात्र आसपासच्या परिसरातील व्यक्तींना त्याचे महत्व पटवून द्यावे व प्राण्यांची काळजी घ्यावी हे सांगावे. अशी माहिती येथील प्राणी व पक्षी अभ्यासक राम मुंढे यांनी सकाळला दिली

भेकर (Barking deer) हे हरणांच्या सारंग कुळातील प्राणी आहे. परंतु या कुळातील हरणासारखे त्याला शिंगे नसतात. त्याच्या आवाजावरून त्याला भुंकणारे हरीण असेही नाव आहे. पुर्णवाढ झालेले भेकराची लांबी साधारणतः १०० ते ११० सेंमी पर्यंत व उंची ४० ते ४५ सेंमी अाणि वजन वजन साधारणतः २५ किलो असते. हे अतिशय लाजाळू असते. घनदाट जंगलामध्ये व प्रामुख्याने पाण्याजवळ आढळते.
- राम मुंढे, स्थानिक वन्यजीव अभ्यासक

Web Title: Marathi news Raigad news animal save

टॅग्स