वार्षिक स्नेहसंमेलनातून महिला सक्षमीकरणाचा जागर

अमित गवळे
रविवार, 14 जानेवारी 2018

सुधागड तालुक्यातील परळी घोटवडे येथील श्रीमद राजचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. मुलगी वाचवा आणि महिला सक्षमीकरण या प्रमुख विषयावर संपन्न झालेल्या कार्यक्रमात तीन वर्षापासून ते चौदा वयोगटातील तीनशे मुलामुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. विदयार्थ्यांनी अापल्या नृत्याविष्कराच्या माध्यमातून उपस्थितांना महिलांबद्दल आदर आणि त्यांना सक्षम करण्यासाठी जागृती केली. 

पाली : परळी येथील श्री राज एजुकेशन सेंटरच्या श्री काकुभाई तन्ना बालवाडी व माध्यमिक विद्यालयाने महिला सक्षमीकरणासाठी प्रबोधनात्मक पाऊल उचलले. संस्थेच्या शालेय वार्षिक स्नेह संमेलनात महिला सक्षमीकरणाचा मुख्य विषय घेऊन विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले.

सुधागड तालुक्यातील परळी घोटवडे येथील श्रीमद राजचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटर च्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. मुलगी वाचवा आणि महिला सक्षमीकरण या प्रमुख विषयावर संपन्न झालेल्या कार्यक्रमात तीन वर्षापासून ते चौदा वयोगटातील तीनशे मुलामुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. विदयार्थ्यांनी अापल्या नृत्याविष्कराच्या माध्यमातून उपस्थितांना महिलांबद्दल आदर आणि त्यांना सक्षम करण्यासाठी जागृती केली. यावेळी संस्थेचे संचालक निलेश मेहता म्हणाले की कोणत्याही देशात महिलांचे स्थान,स्थिती पाहून तुम्ही देशाची स्थिती सांगू शकता. भारतालाही मोठी प्रगती साधायची असेल तर महिला सक्षमीकरण अत्यावश्यक आहे. महिला सक्षमीकरणासाठी समाज, देश आणि महिलांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे. हे प्रयत्न केवळ समाजातील काही महिलांपुरतेच आणि शहरी भागा पुरते मर्यादित न राहता ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आणि शालेय कार्यक्रमातून हे घडतंय याचा मला अभिमान वाटतो असे सांगून स्नेहसंमेलनात सामाजिक विषय ठेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल प्राचार्य डॉ. जोशी यांचे अभिनंदन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. जोशी म्हणाले की प्रेम आचार्यजी उर्फ पप्पाजी यांच्या प्रेरणेने श्रीमद राजचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटर हि संस्था घोटवडे आणि परिसरात वित्राग विज्ञानच्या शाश्वत आध्यत्मिक विज्ञान आणि सराव माध्यमातून शांतता प्रसाराच्या दिशेने श्री राज एजुकेशन सेंटर, श्री राज मेडिकल सेंटर, राज रोटी आणि श्रमिक नारी संघ यांच्या माध्यमातून समाजसेवेची ना नफा ना तोटा या तत्वावर समर्पित भावनेने काम करीत आहे.

या कार्यक्रमाला प्रेम आचार्यजी, संस्थेचे संचालक निलेश मेहता, प्राचार्य डॉ जे.के.जोशी आदी मान्यवरांसह शिक्षक पालक हितचिंतक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Marathi news Raigad news annual gathering