मनुष्य व प्राणी सेवेसाठी जन्म आमुचा..

अमित गवळे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पाली : रायगड जिल्ह्यातील डॉ. अर्चना व गणराज जैन हे दाम्पत्य गेली अनेक वर्ष निराधार व जखमी प्राण्यांसाठी झटत आहेत. गोसेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जैन दाम्पत्यांना "नेताजी सुभाषचंद्र बोस गोसेवा एवं प्राणी रक्षा राष्ट्रीय पुरस्कार"ने सन्मानित करण्यात आले. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त वाराणसी, उत्तर प्रदेश येथे मंगळवारी (ता. 23) आयोजीत कार्यक्रमात प्राणी क्षेत्रातील विशेष कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

डॉ. अर्चना व गणराज जैन यांनी शुभचिंतक व सोबत काम करणारे "टिम सफर"चे सहकारी या सर्वांच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला. या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य इन्द्रेश कुमार, पिठाधीश महंत बालक दास, अजयानंद गिरी, महंत भारद्वाज गिरी, चतुर्भुज नाथ तिवारी, प्रोफ़ेसर अशोक कुमार सिंह तसेच मुस्लीम समाजाचे मुफ़्ती सुभान दानिश यांच्यासह भारतातील अनेक मान्यवर उपस्थीत होते.

जैन दाम्पत्य रायगड जिल्ह्यातील महाड जवळ जखमी प्राणी आणि गो रक्षणासाठी मोफत सफर केंद्र चालवित होते. आत्ता पर्यंत त्यांनी असंख्य जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांना जीवनदान दिले आहे. सध्या ते बदलापुर या स्वरुपाची कामे करत आहेत. आदिवासी व गरजवंतासाठी देखिल ते विविध वैद्यकिय शिबिरे तसेच सहाय्य शिबिरे आयोजित करतात. या आधी गणराज जैन यांना रायगड भुषण पुरस्कारने देखील गौरविण्यात आले आहे.

गेली सात ते आठ वर्ष कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न बाळगता आम्ही प्राणी व आदिवासी या क्षेत्रात अविरत काम करत आहोत. आमच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन अनेक संस्थांनी आजवर आम्हाला सन्मानित केले आहे. आमच्या या कार्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी मदत व सहकार्य केले त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, डॉ. अर्चना व गणराज जैन यांनी मानले.

Web Title: Marathi news raigad news award