विद्यार्थीनींसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर 

लक्ष्मण डुबे
शनिवार, 13 जानेवारी 2018

रसायनी (रायगड) : सशक्त, सुदृढ आणि सुजाण आशी स्त्री निर्माण करण्यासाठी मुलीच्या वाढत्या वयानुसार येणा-या शारीरिक, मानसिक व भावनिक समास्यांचे निराकरण करणे तसेच त्यांना शैक्षणिक व सामाजिक गोष्टीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन येथील श्री साई क्लीनिकच्या डॉ. प्रतिभा महिंद्रकर यांनी केले. 

वासांबे मोहोपाडा येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजात शुक्रवारी (ता. 12) मुलींसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. त्यावेळी डॉ. महिंद्रकर बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाला प्राचार्य दत्तात्रेय सुपेकर, पर्यवेक्षक सिताराम पवार, आदि उपस्थित होते. यावेळी डॉ महिंद्रकर यांनी हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार घ्यावयाची काळजी आणि अॅनिमियासारखे आजार होऊ नयेत यासाठी करावयाच्या उपाययोजनांची उत्तम माहिती दिली. 

डॉ. प्रतिभा महिंद्रकर, डॉ. युगंधरा काकडे यांनी इंडकेमी फार्मा आणि मेयर फार्मा आणि आरिस्टो फार्मा यांच्या सहकार्याने इयत्ता दहावी ते बारावीच्या दोनशे विद्यार्थीनींचे हिमोग्लोबिनची तापासणी केली. यावेळी डॉक्टरांनी विद्यार्थीनीच्या शंकांचे निरसन केले.

Web Title: Marathi news raigad news awareness for girls