बल्लाळेश्वर देवस्थान स्विकारणार कॅशलेस देणगी

अमित गवळे
बुधवार, 31 जानेवारी 2018

पाली (रायगड) : डिजिटलायझेशन व कॅशलेसच्या जमान्यात ऑनलाईन व्यवहारांचा वापर वाढला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे यापुढे आता श्री बल्लाळेश्वर देवस्थानला देणगी देण्यासाठी कोणाला रांगेत उभे राहून पैसे देऊन पावती घेण्याची गरज पडणार नाही. कारण भाविकांना ऑनलाईन देणगी देता यावी यासाठी देवस्थानतर्फे नुकतेच मंदिर परिसरात ई-दानपेटीचे अनावरण करण्यात आले आहे.

पाली (रायगड) : डिजिटलायझेशन व कॅशलेसच्या जमान्यात ऑनलाईन व्यवहारांचा वापर वाढला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे यापुढे आता श्री बल्लाळेश्वर देवस्थानला देणगी देण्यासाठी कोणाला रांगेत उभे राहून पैसे देऊन पावती घेण्याची गरज पडणार नाही. कारण भाविकांना ऑनलाईन देणगी देता यावी यासाठी देवस्थानतर्फे नुकतेच मंदिर परिसरात ई-दानपेटीचे अनावरण करण्यात आले आहे.

अष्टविनायकाचे क्षेत्र असलेल्या पालीत रोज शेकडो भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येतात. अनेक भाविक ऑनलाईन व कॅशलेसचा व्यवहार करतात. अशा भाविकांना देवस्थानला ऑनलाईन देणगी देता यावी या उद्देशाने मंदिर परिसरात ई-दानपेटीचे अनावरण रोहा-सुधागडचे प्रांताधिकारी रविंद्र बोंबले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. या ई-दानपेटीसाठी भीमअॅपद्वारे देणगी स्विकारली जाणार आहे.

 भीम अॅपद्वारे दिल्या जाणाऱ्या देणगीबाबत बँकांकडून कोणत्याही प्रकारचे शुक्ल आकारले जात नाही. त्याच प्रमाणे सदरच्या अॅपमध्ये असलेला पासवर्ड सुरक्षित असल्याने या अॅपचा वापर करताना कोणत्याही प्रकारचा धोका नाही अशी माहिती बल्लाळेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सकाळला दिली. 

हे भीम अॅप जलद, सोपे आणि सुरक्षित आहे. तरी अधिकाधिक भाविकांनी याचा वापर करावा असे आवाहन बल्लाळेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमावेळी पाली तहसिलदार बी. एन. निंबाळकर, सहाय्यक धर्मदाय आयुक्त श्री. पाटील यांच्यासह श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप, उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे, विश्वस्त विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे हे उपस्थित होते.

मंदिर परिसरात ई-दानपेटीची सुविधा उपलब्ध झाल्यामूळे त्याचा वापर करुन भाविकांना देणगी देऊन कॅशलेस व्यवहार करता येणार आहेत. त्यामूळे कॅशलेस व्यवहारांना देखील उत्तेजन मिळणार आहे. अधिकाधीक भाविकांनी या डिजीटल प्रणालीचा वापर करावा, असे बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप यांनी सांगितले.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
भाजपा म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे
आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​
मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​
"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​
विकासवृद्धीसाठी झेपावे निर्यातीकडे!​

श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम
तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​
दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​

Web Title: Marathi news raigad news ballaleshwar temple cashless donation