रायगड जिल्ह्यातील वीट व्यवसाय आर्थिक अडचणीत

लक्ष्मण डुबे 
बुधवार, 10 जानेवारी 2018

रसायनी (रायगड) : सिमेंट विटांचे अतिक्रमण, आर्थिक मंदी, वाढलेली मजुरी आणी कच्चा मालाच्या किंमती, आदि कारणांमुळे रसायनी पाताळगंगा परिसरातील वीट व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागणी घटल्याने अनेक कारखानदारांकडे मागील वर्षाचा विटांचा साठा शिल्लक असल्याने चावणा पंचक्रोशितील काही कारखाने बंद पडले आहेत. तर सुरू असलेल्या कारखान्यांत विटा बनविण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. 

परीसरातील वडगाव, मोहोपाडा, चावणा, आपटा पंचक्रोशीत विटांचे कारखाने आहेत. नजीकचा खारपाडा परिसर विट निर्मीतीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. परीसरातील विटांना रसायनी पाताळगंगा परीसरातील कारखाने, तसेच पनवेल, नवीमुंबई गृहप्रकल्प बांधकाम व्यवसायिकांकडून विटांना मागणी होती. मात्र बाँल्क विटाचे अतिक्रमण आणि आर्थिक मंदीमुळे बांधकाम व्यवसाय अजूनही मंदावला असल्याने फारशी मागणी वाढलेली नाही. त्यामुळे व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकांकडे विटांचा अजूनही मागील वर्षाचा साठा शिल्लक आहे. 

पूर्वी विटभट्या दसऱ्यानंतर सुरू होत असत. मात्र मागील चार-सहा वर्षांपासून पाऊस लांबत असल्याने दिवाळी किंवा त्यानंतर कारखाने सुरू होत आहेत. या वर्षी पाऊस लांबल्याने कारखाने काही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तर काही डिसेंबर मध्ये सुरू झाले आहे. सुरू करताना कारखाने उशीरा सुरू झाले आहे असे सांगण्यात आले.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने व्यावसायिकांची काळजी वाढू लागली आहे. कच्चा माल व वाहतुक यांच्या दरात दर वर्षी  वाढ होते. व्यवसाय परवडत नाही तरी पण काही काळ तग धरू असे सांगण्यात आले. तर वाढलेला खर्च व घटलेली मागणी म्हणून चावणा परीसरातील चार पाच जणांनी व्यवसाय बंद केले आहेत असे व्यवसायिक 
सत्यवान देशमुख यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news raigad news bricks business face economical problems