रायगड - सुधागड तालुक्यात विषबाधेने 8 गुरांचा मृत्यु

अमित गवळे
गुरुवार, 15 मार्च 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथे 8 गुरांचा मृत्यु झाला आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्राथमिक तपासणीत विषबाधेने ही गुरे दगावली असल्याचे सांगण्यात आले. मृत गुरांमध्ये 5 दुभत्या व गाभण गाईंचा तर 3 बैलांचा समावेष होता. शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाखांहुन अधिक रुपयांचे नुकसान झाले असून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथे 8 गुरांचा मृत्यु झाला आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्राथमिक तपासणीत विषबाधेने ही गुरे दगावली असल्याचे सांगण्यात आले. मृत गुरांमध्ये 5 दुभत्या व गाभण गाईंचा तर 3 बैलांचा समावेष होता. शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाखांहुन अधिक रुपयांचे नुकसान झाले असून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.

ही माहिती समजताच जि.प सदस्य सुरेश खैरे व पाली पंचायत समिती सभापती साक्षी दिघे यांनी पशुवैद्यकीय पथकासह तातडीने नांदगाव येथे घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. नांदगाव हद्दीत बुधवारी (ता. 14) दुपारी दिड ते दोन वाजताच्या सुमारास काही गुरे मृत्यूमुखी पडल्याचे ग्रामस्तांच्या निदर्शनास आले. यावेळी मृत गुरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणावर लाळ व फेस आला होता. त्यांनी तत्काळ पंचायत समिती सभापती साक्षी दिघे यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार सभापती दीघे यांनी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना या घटनेची माहिती देऊन पथकासह तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ भोजने यांच्यासह प्रविण धुमाळ, मोकल, वारगुडे, आदींनी गुरांची पाहणी केली व तीन मरणावस्थेत असलेल्या गुरांवर तातडीने उपचार केले. परंतू मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याने ती गुरे वाचू शकली नाहीत.

येथील किसन दगडू खैरे या शेतकर्‍याचा 1 बैल तसेच सखाराम रामचंद्र खैरे- 1 गाय, बाळकृष्ण धावडे- 1 गाय, बबन भोईर- 1 गाय, परशुराम शिंदे- 1 गाय, हरी वाळेकर- 1 बैल, नथु वाघमारे- 1 बैल, राई शंकर वाघमारे- 1 गाय आदी शेतकर्‍यांची गुरे दगावली आहेत. गुरांना विषबाधा झाली असल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून गुरांना नेमकी विषबाधा कशामुळे झाली. विषबाधा कोणी केली. याचा कसून शोध घेण्याची मागणी यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली. जि.प सदस्य सुरेश खैरे यांनी  नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. 

या मृत गुरांच्या तोंडाला फेस येऊन लाळ गळत होती. सदर गुरे विषबाधेने दगावली असून मृत गुरांचे शवविच्छेदन करुन काही नमुने पुढील तपासासाठी रोग निदान प्रयोगशाळा पुणे येथे तातडीने पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त होताच हे विष नेमके कोणते आहे हे निष्पन्न होईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे डॉ. सोमनाथ भोजने यांनी सांगितले.

गुरांनी नेमके काय खाल्ले? व ते विष नेमके कोणते होते? याचा शोध घेतला जावा. यामुळे आमचे मोठे नुकसान झाले असून शेतकर्‍यांना झालेल्या पशुधन नुकसानीचा योग्य तो मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकरी किसन दगडू खैरे यांनी केली.

Web Title: Marathi news raigad news cattle dies poisoning