रायगडमधील मोहोपाड्यात आता तिसऱ्या डोळ्याची नजर

लक्ष्मण डुबे 
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

रसायनी (रायगड) : वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने मोहोपाडा येथील नाक्यावरील वाहतुक पोलीस चौकीत बसवलेल्या सी सी टी व्ही कॅमेराचे उदघाटन रविवार (ता.  04) रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण सभापति ऊमाताई मुंढे यांच्या हस्ते झाले. तर मोहोपाड्यात यापुढे तिसऱ्या डोळ्याची नजर आसणार आहे. तर सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यासाठी माजी सरपंच संदीप मुंढे आणि सरपंच कृष्णा पारंगे यांनी पुढाकार घेतला आहे. 

यावेळी खालापुर तालुका पंचायत समिति सदस्या वृषाली पाटील आणि कांचन पारंगे, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे, मोहोपाड्याचे सरपंच कृष्णा पारंगे, उपसरपंच संदेश जाधव, माजी सरपंच संदीप मुंढे व सचिन तांडेल, सदस्या सदगुणा पाटील, जयश्री पाटील, सुनंदा मालकर, जयश्री गोपाळे ग्राम विकास आधिकारी मोहन दिवकर मोहोपाडा व्यापारी आसोशिएशनचे खंडुशेठ मालकर, ह भ प अनंत महाराज कार्ले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा पाटील आदि उपस्थित होते. 
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांनी प्रस्ताविक केले. तर यावेळी बोलताना अनंत महाराज कार्ले ऊमाताई मुंढे यांनी मोहोपाडा पंचक्रोशितील अनेक समस्या सोडविल्या आहे. आता पर्यंत ऊमाताई यांनी केलेल्या कामाची कार्ले यांनी स्तुती केली. 

मोहोपाडा हे रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राचे तसेच परीसरातील सुमारे चाळीस गावांचे मुख्यालय आहे. मोहोपाड्यात लोकांची वर्दळ वाढत आहे. तसेच गावातुन दांड पेण राज्य मार्ग गेला आहे. वाढत्या चोऱ्यांना आळा घालणे तसेच रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी झाल्यास वाहतुकीच्या नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे सोईचे होईल त्यासाठी मोहोपाडा येथे सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याची मागणी मागील पाच सहा वर्षा पासुन होत होती. या मागणीच्या "सकाळने" बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मोहोपाड्यात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आणि बाजर पेठेत असे दहा कॅमरे बसविण्यात आले. दरम्यान सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने व्यापारी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Web Title: Marathi news raigad news cctv camera in mohopada