कामगारांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नसल्याने नाराजी

लक्ष्मण डुबे
शनिवार, 10 मार्च 2018

बैठकीला कर्मचारी राज्य विमा योजना उपसंचालक ओमप्रकाश ठाकुर, वीरेंद्र कुमार, दिनकर हे आधिकारी तसेच पाताळगंगा, खोपोली, महाड, तळोजा, रोहा आदि ठिकानच्या औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याचे प्रतिनिधि उपस्थित होते.

रसायनी : (रायगड) कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) रायगड जिल्हयात दिड वर्षांपूर्वी लागू करण्यात आली आहे. मात्र लाभार्थी कामगारांना अजुनही चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे पनवेल येथे कर्मचारी राज्य विमा योजनाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कारखानदांरानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यात अद्यावत रूग्णालय उभारण्यात यावे आशी मागणी करण्यात आली आहे.

बैठकीला कर्मचारी राज्य विमा योजना उपसंचालक ओमप्रकाश ठाकुर, वीरेंद्र कुमार, दिनकर हे आधिकारी तसेच पाताळगंगा, खोपोली, महाड, तळोजा, रोहा आदि ठिकानच्या औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याचे प्रतिनिधि उपस्थित होते. कर्मचारी राज्य विमा योजना 1आँगस्ट 2016 पासून रायगड जिल्हयात लागू करण्यात आली आहे. साधारण एकवीस हजार पर्यंत पगार असणारे सर्व कामगार योजनेचे सदस्य आहे. मासीक पगारातुन शेकडा चार टक्के रक्कम कापली जात आहे सांगण्यात आले. 

मात्र योजनेचे लाभार्थी कामगारांसाठी काही ठिकानी खास रूग्णालयाची सुविधा आजुन उपलब्ध नाही. त्यामुळे इतर ठिकानी जाताना गैरसोय होत आहे, तर काही डॉक्टरांनी चिकित्सासाठी वेळेचे बंधन घातले आहे. त्यामुळे आजुन गैरसोय वाढत आहे, तसेच ज्या रूग्णालयात सुविधा उपलब्ध आहे. तेथे चांगल्या सुविधा मिळत नाही, आदी तक्रारी उपस्थित करून कारखानदारांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. चांगल्या रूग्णालयात कामगार आणि कुंटूबियांना सुविधा उपलब्ध करून दयावी आशी मागणी कारखानदारांनी केली आहे. तर रायगड जिल्हा कर्मचारी राज्य विमा योजना लाभार्थी कामगारांसाठी अद्यावत रूग्णालय उभारण्यात यावे आशीही मागणी करण्यात आली आहे असे सांगण्यात आले. 

तसेच रसायनीतील एचओसी कारखाना बंद झाला आहे. या कंपनीचे एके काळी जिल्हायात आधारवड समजले जाणारे सुसज्ज रूग्णालय पडुन आहे. या रूग्णालयात रायगड जिल्ह्यातील कर्मचारी राज्य विमा योजना लाभार्थी कामगारांसाठी अद्यावत रूग्णालय सुरू करावे आशी मागणी कामगार आणि कारखानदारां कडुन जोर धरू लागली आहे.

Web Title: Marathi news Raigad news ESIC worker