रायगड - पालीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले अपंग भवन

अमित गवळे   
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

पाली (रायगड) : पाली येथे महाराष्ट्रातील पहिले अपंग भवन उभारले जात अाहे. या अपंग भवनास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या खासदार फंडातून तब्बल 10 लाखाचा निधी उपलब्ध होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील सुधागड, रोहा, अलिबाग, महाड, तळा, माणगाव येथील अपंग बांधवांना इलेक्ट्रोनिक रिक्षा देण्यात येणार असल्याचे गिते यांनी सांगितले.

अपंग संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष साईनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जागृत्ती अपंग कल्याणकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश सोनकर व शिवसेना अपंग सहाय्य सेना सुधागड तालुका संघटक रमेश मुल्ल्या यांच्यासह पदाधिकारी व अपंग बांधवांनी अनंत गिते यांची भेट घेतली. अपंग भवनाकरीता निधी मिळण्याकरीता संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची गिते यांनी तत्काळ दखल घेतली व खासदार फंडातून अपंग भवनाला 10 लाखाचा निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. 

याबरोबरच रायगड जिल्ह्यातील सुधागड, रोहा, अलिबाग, महाड, तळा, माणगाव येथील अपंग बांधवांना इलेक्ट्रोनिक रिक्षा देण्यात येणार असल्याचे ना. गिते यांनी सांगितले. या इलेक्ट्रॉनिक रिक्षा अपंग बांधवांना व्यवसायीक दृष्ट्या उपयुक्त ठरणार अाहेत. त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन अपंग बांधवांना आपली प्रगती साधता येणार आहे. याबद्दल अपंग बांधवांनी अनंत गिते यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, शिवसेना सुधागड तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, शिवेसना रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे आदिंचे आभार मानले आहेत. यावेळी जागृत्ती अपंग कल्याणकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश सोनकर,शिवसेना अपंग सहाय्य सेना सुधागड तालुका संघटक रमेश मुल्ल्या,जयराम तेलंगे, सखाराम कुडपणे, दिपेश वालगुडे, सौरभ पालांडे, भरत अधिकारी, संतोष डाके, महेश देशमुख आदिंसह अपंग बांधव उपस्थित होते.

Web Title: Marathi news raigad news maharashtra first handicap center