राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे श्रमदानातून शास्वत ग्रामविकासाकडे

Nss
Nss

पाली : सुधागड एज्युकेशन सोसायटीचे शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीर सिध्देश्वर येथे नुकतेच पार पडले. या शिबीरात विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सिद्धेश्वर आणि पुई येथे दोन वनराई बंधारे बांधले. यामुळे येथील पाणी प्रश्न सुटून भुजल साठयात वाढ होऊन पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण झाले आहेत.

 या शिबीराचे उद्घाटन सु.ए.सो.चे अध्यक्ष वसंत ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. भु आणि जलाच्या स्थायी उपचारांबरोंबरच स्वस्त व श्रमीक पर्याय असलेले हे बंधारे जलसाठा वाढविण्याकरीता अत्यंत उपयुक्त ठरतात. पाण्याची तिव्रता व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दगड माती व रिकाम्या सिमेंटच्या पोत्याच्या सहाय्याने बंधारे बांधण्यात आले. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी साठा होईल या दृष्टीने वनराई बंधार्‍याची जागा निवडण्यात आली. पुई व सिध्देश्वर येथे वनराई बंधारा बांधल्याने पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण झाले. त्यामुळे सिध्देश्वर व पुई ग्रामस्तांनी महाविद्यालयाचे आभार मानले. या शिबीरात 150 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. 

सिध्देश्वर येथील श्री शंकर मंदीरात स्वयंसेवकांची निवासी व्यवस्था करण्यात आली होती. सदर शिबीरात विविध विषयांवर एन.एस.एस. प्रमुख प्रा. बि.एस.बिडवे, प्रा. अशोक मोरे, शेठ ज.नौ.पालीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन, एन.एस.एसचे रायगड जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. एम.एन.वाणी आदिंसह अन्य मान्यवरांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच अंधश्रध्दा निर्मुलन समिती शाखा पालीचे पदाधिकारी निंबाळकर व अन्य सहकारी यांनी प्रात्यक्षिकांसह अंधश्रध्दा निर्मुलन या विषयावर मार्गदर्शन केले. शिबीराच्या यशस्वततेसाठी सिध्देश्वर सरपंच उमेश यादव व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सिध्देश्वर मंदीराचे विश्वस्त श्री कोणकर, आदिंसह ग्रामस्तांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबीराच्या यशस्वी नियोजनात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम.ए.बडगुजर, प्रा.एस.व्ही.पाथरकर, प्रा. दिप्ती लखिमले, श्री. शिंदे आदींचा सहभाग होता. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमदान शिबीरात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेत शिबीर यशस्वी केले. 

या शिबिरात विद्यार्थ्यांनी रस्ते बांधणे, ग्रामस्वच्छता, बंधारा बांधणे, मंदीर परिसराची स्वच्छता या कामात सहभाग घेतला होता. सिध्देश्वर ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या गावात व आदिवासीवाड्या पाड्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच विविध कार्यक्रमात सहभाग घेवून वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्यसनाधिनता, महिलांवरील वाढते अन्याय अत्याचार,स्वच्छता अभियान, स्त्री भ्रुण हत्या आदी विषयावर पथथनाट्ये सादर करुन प्रभाविपणे जनजागृती व प्रबोधन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com