नवीन वर्षाचे स्वागत गरजूंना मदतीचा हात देऊन करा

अमित गवळे 
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

पाली : सरत्या वर्षाला अलविदा करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच जण सज्ज झाले आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री सगळीकडे रोषणाई व लज्जतदार पक्वान्नाची मेजवानी असणार आहे. अशात एका वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आणि डोक्यावर छत नसलेल्यांना मात्र ही रात्र नेहमी प्रमाणेच असणार आहे. अशा लोकांना मदतीचा हात द्यावा व त्यांच्या ही तोंडी दोन घास पडून घरात रोषणाई व्हावी यासाठी सोशल मिडीयाद्वारे जनजागृतीपर संदेश फिरत आहे. यास सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

एकच विनवणी.....भेटाया भाकरीला निघाली भूक आहे. जन्मता येती गरीबी कोणाची चूक आहे.....31 डिसेंबरला वायफळ खर्च न करता एका तरी गरीबाला मदत करा..... कदाचित हे केलेले पुण्य कुठे तरी आडवे येईल.... असा संदेश व्हॉट्सअप व फेसबुकवर फिरत आहे. यावर अनेकांनी सकारात्मक विचार करून त्यानुसार अंमल बजावणी करणार असल्याचे सकाळला सांगितले आहे. पालीतील सामजिक कार्यकर्ते संजय आप्पा घोसाळकर यांनी सांगितले की मागील काही दिवसांपूर्वीच हा मेसेज मी फेसबुकवर पोस्ट केला आहे. अनेकांनी यावर खुप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असून अशा प्रकारे कृती करणार असल्याचे सुद्धा सांगितले आहे. त्यामुळे चांगली जनजागृती होत आहे.

नवीन वर्षाचे स्वागत एका सत्कार्याने करावे आणि आपला वेळ आणि पैसा नको त्या गोष्टित दवडण्यापेक्षा अशा प्रकारे समाज कार्य करावे असा पण अनेकांनी केला आहे. त्यामुळे सोशल मिडियाचा उपयोग सकारात्मक परिवर्तनासाठी झाला आहे. काही जण अशा प्रकारे गरीब व गरजवंतांना आर्थिक किंवा वस्तु रुपात मदत करून नवीन वर्षाचे स्वागत करतात देखील.

31 डिसेंबरला वायफळ खर्च करण्यापेक्षा गरीबांना मदत करणे योग्यच त्याचे फळ भविष्यात मिळेलच यात काही वावगे नाही. मी सुद्धा अशा प्रकारे 31 डिसेंबरला गरजूंना मदत करून साजरा करणार आहे, असे दिलीप नरशी गावीत या शिक्षकांनी सांगितले.

Web Title: Marathi news raigad news news year help to poors message viral on social media

टॅग्स