पालीत बल्लाळेश्वर माघी मासोत्सवाच्या तयारीला वेग

अमित गवळे
बुधवार, 17 जानेवारी 2018

माघी मासोत्सवानिमित्त पालीत विविध धार्मीक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना सोईसुविधा पुरविण्याबरोबरच भाविकांची गैरसोय होवू नये या करीता बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट नेहमीच दक्षता व खबरदारी घेत असते. माघी मासोत्सवास राज्यसह इतर राज्यातूनही लाखो संख्येने भाविक पालीत दाखल होतात.

पाली : अष्टविनायक देवस्थानापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सव मिती माघ शु. 1 शके 1939 गुरुवार १८ ते मिती माघ शुध्द 5 शके 1939 सोमवार 22जानेवारी 2018 या कालावधीत साजरा होत आहे. यानिमित्त बल्लाळेश्वर मंदिराच्या कार्यालयात माघी मासोत्सवाच्या नियोजनाबाबत बैठक संपन्न झाली.

माघी मासोत्सवानिमित्त पालीत विविध धार्मीक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना सोईसुविधा पुरविण्याबरोबरच भाविकांची गैरसोय होवू नये या करीता बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट नेहमीच दक्षता व खबरदारी घेत असते. माघी मासोत्सवास राज्यसह इतर राज्यातूनही लाखो संख्येने भाविक पालीत दाखल होतात. भाविकांना रांगेत व शिस्तबध्दरित्या दर्शन घेता यावे याकरीता देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासन व पाली ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या अाहेत. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांनी माघी मासोत्सव शांततेत पार पडण्याकरीता जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. उत्सवादरम्यान सुव्यवस्था व सुरक्षिता राखण्यासाठी स्थानिक नागरीकांसमवेत व्यवसाईकांनी अधिक दक्ष राहावे.

कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू मंदीर परिसरात आढळल्यास तत्काळ पोलीसांना माहिती द्यावी. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदाी घ्यावी. तुमचे डोळे हेच सी.सी.टिव्ही कॅमेरे आहेत. संशयीत नजरा हेरुन पोलीसांना माहिती द्या. प्रत्येकाने स्वयंसेवक बनून काम करावे.आलेल्या भाविकांना सर्वोतोपरी सहकार्य करा. जनता व पोलीस यांच्यामध्ये सौदार्हपुर्ण नाते असल्यास शांतता व सुव्यवस्था राखण्यास हातभार लागतो. असे पोलीस निरिक्षक पाटील म्हणाले. उत्सवादरम्यान रुग्नवाहीकेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहतुक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यात येत आहे. भाविकांना प्रसाद व पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पादत्राणे ठेवण्याकरीता रॅक ठेवण्यात येणार आहेत. सहा अग्निरोधक यंत्र बसविण्यात येणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोप बांधण्यात येणार आहे. तसेच भाविकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. 

माघी मासोत्सवास अधिक भाविकांनी उपस्थीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पालीच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीस पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील,बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच अॅड. धनंजय धारप, उपसरपंच जितेंद्र गद्रे, विश्वस्त माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहूल मराठे आदिंसह व्यापारी व व्यवसाईक उपस्तीत होते.

Web Title: Marathi news Raigad news pali