रायगड : पाली पोलीस स्थानकाच्या शिरपेचात आय.एस.ओ मानांकन

अमित गवळे
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

पाली (रायगड) : गुणवत्ता, व्यवस्थापन व सुरळीत व आदर्श कारभार याबद्दल पाली पोलीस स्थानकाला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे. आय.एस.ओ चिफ ऑडीटर राजेश झोड, विजय कांबळे यांच्या हस्ते पाली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी नुकताच रोह्यात हा सन्मान स्विकारला. यावेळी पाली पोलीस स्थानकाला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पाली (रायगड) : गुणवत्ता, व्यवस्थापन व सुरळीत व आदर्श कारभार याबद्दल पाली पोलीस स्थानकाला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे. आय.एस.ओ चिफ ऑडीटर राजेश झोड, विजय कांबळे यांच्या हस्ते पाली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी नुकताच रोह्यात हा सन्मान स्विकारला. यावेळी पाली पोलीस स्थानकाला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांनी पाली पोलीस स्थानकात निरीक्षकपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस स्थानकाचा कायापालट केला आहे. सुसज्य इमारतीसह सर्व अत्याधुनिक सेवासोईसुविधा पोलीस स्थानकांत निर्माण करण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच वाढत्या गुन्हेगारीवर अाळा बसविण्यास यश अाले आहे. पोलीस स्थानकात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वायफाय इंटरनेट सुविधा कार्यान्वित करण्यात आल्याने येथील ऑनलाईन कामांना गती आली आहे. 

पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील म्हणाले की कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे घडू नये म्हणून प्रयत्न करणे, गुन्हा घडल्यास त्या गुन्ह्याचा जलद तपास करणे, तसेच पोलीस स्थानकांत येणार्‍या सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींची सौजन्यपुर्णरित्या दखल घेऊन त्या निवारण्यासाठी पोलीस तत्पर आहेत. 

सायबर गुन्हे, फसवणुकीचे गुन्हे घडू नयेत या दृष्टीकोनातून शाळा, कॉलेज, सोसायटी व गावागावात प्रबोधन व जनजागृती करण्यावर भर दिला गेला अाहे. यावेळी आय.एस.ओचे चिफ ऑडीटर राजेश झोड, विजय कांबळे यांच्यासह अप्पर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र जैन आदिंसह पाली पोलीस उपनिरिक्षक एल.व्ही.म्हात्रे, पोलीस उपनिरिक्षक एन.डी.चव्हाण,पोलीस उपनिरिक्षक एस.बी.पाटील, पो.ह.प्रफुल चांदोरकर, पो.ना. विनोद पाटील, पो.कॉ. अमोल पाटील, महिला पो.ना. सिमा चांदोरकर, सिमा पाटील आदिंसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाली पोलीस स्थानकाची सर्वसोईसुविधांनी परिपूर्ण असलेली सुसज्य इमारतीमुळे येथील पोलीस कर्मचार्‍यांना तणावमुक्त व अधिक उत्साहाने काम करण्यास वाव मिळाला आहे. जनतेला सुविधा मिळाव्यात. त्यांच्या तक्रारी व अडचणींचे जलद निराकरण व्हावे या दृष्टीकोणातून पाली पोलीस प्रयत्नशिल आहेत. कामकाजासाठी अाधुनिकतेचा वापर करुन कामे गतीमान होत आहेत. तसेच समाजात विविध स्तरावर जनजागृती व प्रबोधन देखील केले जात आहे, असे पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले.

Web Title: Marathi news raigad news pali police station ISO nomination