रायगड - एकच प्रकरण तडीस नेण्यासाठी तीन वेळा उपोषण

अमित गवळे
मंगळवार, 6 मार्च 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासिक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचाची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर या अपंग व्यक्तीने केला आहे. संबंधित ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरीता गजानन वाडेकर रा. करंजघर- विठ्ठलवाडी हे सोमवारी (ता. 5) पाली पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. 

पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांना वाडेकर यांनी निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. ग्रामसेवकाच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणाची जलद चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे लेखी आश्वासन गजानन वाडेकर यांना यापूर्वी देण्यात आले होते. परंतू चार महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी शासन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने गजानन वाडेकर यांनी आपल्या मागणीच्या पुर्ततेसाठी पुन्हा एकदा उपोषणाचा पावित्रा घेतला आहे.  या प्रकरणा संदर्भातील वाडेकर यांचे हे तिसरे उपोषण आहे.   

खवली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एस.व्ही.चौकर यांनी 24 मार्च 2015 रोजीच्या मासिक सभेतील इतिवृत्तात तत्कालीन सरपंच सुलभा पवार यांची खोटी सही केल्याचा आरोप वाडेकर यांनी केला आहे. या संदर्भात वाडेकर यांनी 21 मार्च 2016 व 06 नोहेंबर 2017 ला ग्रामसेवकावर कारवाई होण्याच्या मागणीच्या अनुषंगाने उपोषण केले होते. या बरोबरच अनेकदा तक्रारी अर्जाद्वारे ग्रामसेवकावर कारवाई होण्याची मागणी केली होती. परंतु सुस्त प्रशासन या प्रकरणी दुर्लक्ष करीत असून वेळ काढूपणाची भूमिका घेत असल्याने अखेर पुन्हा एकदा गजानन वाडेकर पाली पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत संबंधित ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहिल असा इशारा वाडेकर यांनी दिला आहे. 

यावेळी उपोषणकर्ते गजानन वाडेकर यांच्यासह माजी सरपंच सुलभा पवार, चंद्रकांत टाकळेकर, सदाशिव नाडकर, अरुण खराडे, गणेश यादव, रमेश वाडेकर, रुपेश कॉरकर आदिंसह ग्रामस्त उपस्थीत होते. 

Web Title: Marathi news raigad news pali proxy sign grampanchayat hunger strike