भारतीयन्स फाऊंडेशनने दिले आदिवासी विदयार्थ्यांना खेळाचे साहित्य

अमित गवळे
बुधवार, 31 जानेवारी 2018

पाली (रायगड) : गोरेगाव येथील भारतीयन्स फाऊंडेशनच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना विविध खेळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांना विविध खेळात आपली चुणूक दाखविता यावी, त्यांच्यामधून देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत हा यामागील उद्देश आहे. 

पाली (रायगड) : गोरेगाव येथील भारतीयन्स फाऊंडेशनच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना विविध खेळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांना विविध खेळात आपली चुणूक दाखविता यावी, त्यांच्यामधून देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत हा यामागील उद्देश आहे. 

प्रजासत्ताक दिनी भारतीयन्स फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. त्यानिमित्ताने भारतीयन्स फाऊंडेशनच्या प्रथम कार्यक्रमात माणगाव तालुक्यातील नांदवी येथील आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. या सहित्यामध्ये बॅट, बॉल, कॅरम बोर्ड, बॅडमिंटन, स्टम्प, चेस बोर्ड आदि साहित्याचा समावेश आहे. यावेळी भारतीयन्स फाऊंडेशनचे संस्थापक स्वानंद महाडिक, अध्यक्ष दिनेश चव्हाण, उपाध्यक्ष दिपक पवार, विनायक गायकर, सिद्धेश गायकर, अनिकेत महाडिक, सौरभ जगताप, दिपक पवार, अविनाश उंडरे, तरुण शिंदे, राकेश गोरेगांवकर, प्रसाद खुटवल, अनिकेत घोसाळकर, प्रितेश गायकवाड, अजित पांचाळ, सुचित गांधे, सुरज खांबे, अनुरघ नाडकर, प्रथमेश कानडे, सिद्धेश कदम, दिपेन महाडिक, रोहित माने, जयेश राजभर व फाउंडेशनचे सर्व सभासद, शाळेतील विदयार्थी मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग,वनविभागाचे कर्मचारी, कृषी अधिकारी, नांदवी गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकाभिमुख कामे करण्यासाठी तसेच विविध प्रकारे गरजवंतांना मदत व सहकार्य करण्याच्या उद्देशाने भारतीयन्स फाऊंडेशनची स्थापना केली आहे. सर्व तरुणांनी एकत्र येऊन आपल्या समाजासाठी पर्यायाने आपल्या देशासाठी सेवाभावी वृत्तीने काम करण्याची गरज आहे. तरच आपण आपला विकास साधून प्रगती करु शकतो. भारतीयन्स फाऊंडेशन देखील आगामी काळात अशा स्वरुपाची कामे करणार आहे, असे भारतीयन्स फाऊंडेशनचे संस्थापक स्वानंद महाडिक यांनी सांगितले.

 

Web Title: Marathi news raigad news playing kits tribal students