जांभिवली ते बामणोली धरणापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यामुळे दुरावस्था 

लक्ष्मण डुबे
बुधवार, 10 जानेवारी 2018

रसायनी (रायगड) : रसायनीतील जांभिवली ते बामणोली धरणापर्यंतच्या रस्त्याची खड्डे पडुन दुरावस्था झाली आहे. धरणाच्या परीसरातील शिवारातील शेतकऱ्यांचे आणि पर्यटकांचे धरणाकडे जाताना हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे आशी मागणी करण्यात आली आहे. जांभिवली गावाच्या हद्दीतील घेरा मणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणावर रसायनी, पनवेल, परिसरातून फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान जांभिवली गावापासून ते धरणापर्यंतच्या साधारण दिड किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे खडीकरण केलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

रसायनी (रायगड) : रसायनीतील जांभिवली ते बामणोली धरणापर्यंतच्या रस्त्याची खड्डे पडुन दुरावस्था झाली आहे. धरणाच्या परीसरातील शिवारातील शेतकऱ्यांचे आणि पर्यटकांचे धरणाकडे जाताना हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे आशी मागणी करण्यात आली आहे. जांभिवली गावाच्या हद्दीतील घेरा मणिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणावर रसायनी, पनवेल, परिसरातून फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान जांभिवली गावापासून ते धरणापर्यंतच्या साधारण दिड किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे खडीकरण केलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत आणि टोकदार खडी यामुळे वाहन नादुरूस्त होण्याच्या भितीने हलकी वाहने धरणापर्यंत घेऊन जात येत नाहीत. त्यामुळे पर्यटकांना पायपीट करून जावे लागते. जाताना हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धर्मराज जाधव यांनी केली आहे. 

 

Web Title: Marathi news raigad news potholes on jambhivali to bamnoli road