रायगड : परतीच्या पावसाने शेतकऱयांना रडविले

अमित गवळे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

पाली (रायगड) : जिल्ह्यात सर्वत्र भाताचे पिक भरघोस आले आहे. मात्र परतीच्या पावसाने शेतीची दैना उडवली. 

शुक्रवारी (ता.६) जिल्ह्यात एकुण ६९४.२२ मिमी पाऊस पडला. सरासरी पर्जन्य ३०.८९ मिमी झाले. विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे भाताची उभी पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर पडली. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

 शुक्रवारी जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस रोहा तालुक्यात पडला १०५ मिमी तर सर्वात कमी पाऊस पनवेल तालुक्यात ४.२० इतका पडला. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणची विज खंडीत झाली होती. सुधागड, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, पेण आदी तालुक्यांत वीज पुरवठा वारंवार खंडीत होत होता. सुधागड तालुक्यातील उन्हेर गावात काही ठिकाणी झाडांच्या फांद्या घरांवर पडल्या तर विजेचे खांब कोसळले. येथे शनिवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. यामुळे नागरीक हैराण होते.

काही ठिकाणी रस्त्यावर व वस्तीच्या ठिकाणी झाडाच्या फांद्या आणि झाडे कोसळली होती. दुपारी साडेबार वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीची आकडेवारी आली नव्हती.

'सकाळ'ने शुक्रवारच्या अंकात पावसाचा अंदा व्यक्त करुन सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच भात कापणीसाठी काही दिवस थांबण्याचे आवाहनसुद्धा केले होते. यामुळे काही शेतकऱयांनी आपला भात कापला नाही. 

Web Title: Marathi news Raigad news retreating monsoon farms flooding