रायगड जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी राकेश सावंत

अमित गवळे
शुक्रवार, 16 मार्च 2018

पाली (रायगड) : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेशी संलग्न असलेल्या रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी राकेश सावंत यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या फेरनिवडीबद्दल त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. 

पाली (रायगड) : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेशी संलग्न असलेल्या रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी राकेश सावंत यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या फेरनिवडीबद्दल त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. 

राकेश सावंत यांनी यापुर्वी 8 एप्रिल 2016 रोजी हा पदभार स्विकारला होता. त्यांनी महसूल कर्मचार्‍यांच्या न्यायहक्कासाठी अविरतपणे व जोमाने काम सुरु ठेवले आहे.  राकेश सावंत यांनी महसूल कर्मचार्‍यांना भेडसावणारे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी नेहमीच महत्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. तहसिल कार्यालयात येणार्‍या नागरीकांना आवश्यक ते सहकार्य करुन प्रत्येकाचे काम जलदतेने करुन देण्याची त्यांची हातोटी वाखण्याजोगी आहे.

राकेश सावंत यांच्या नेतृत्वात महसूल कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यात यशस्वीरित्या कामबंद आंदोलन करण्यात आले होते. तसेच पुरवठा विभागातील सरळसेवा भरती बंद करण्याबाबत आंदोलन करण्यात आले. मागील सहा वर्ष महसूल कर्मचार्‍यांची बंद असलेली पदोन्नत्ती सेवा पुन्हा पुर्ववत करुन दोन वर्षात विवीध प्रवर्गाच्या किमान 65 पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळवून देणेकामी सावंत यांचे विशेष योगदान आहे.

जिल्हा प्रशासन व महसूल कर्मचारी यांच्यात योग्य तो समन्वय साधून कामकाजास गती देण्यासाठी राकेश सावंत यांची भुमिका मोलाची ठरली आहे. त्यांच्या एकूणच कामगिरीचे मुल्यमापन करुन 15 तालुक्यातील महसूल कर्मचार्‍यांच्या आग्रहास्तव राकेश सावंत यांची एकतर्फी व बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राकेश सावंत यांची रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पाली-सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर, नायब तहसिलदार वसंत सांगळे, नायब तहसिलदार वैशाली काकडे, मंडळ अधिकारी वाघ आदिंसह महसूल कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले. 

Web Title: Marathi news raigad news revenue employee union rakesh sawant