विद्यार्थ्यांच्या गुढ, अनाकलनीय प्रश्नांचे निराकरण

अमित गवळे
सोमवार, 1 जानेवारी 2018

उद्धर गावातील इको अार्किटेक्ट तुषार केळकर यांच्या सहकार्याने पाली अंनिस शाखेने हा कार्यक्रम घेतला.यावेळी अंनिस पाली शाखेचे कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांनी पाण्यावर दिवा पेटवणे, जिभेतून तार अारपार बाहेर काढणे, हवेतून सोन्याची चैन व अंगारा काढणे, पेटता कापूर खाणे, रिकाम्या गडूमधून तीर्थ काढणे यांसारखे प्रयोग विद्यार्थ्यांच्या सहभागाने करुन दाखविले. 

पाली : लाढीदेवी रामधर माहेश्वरी रात्र वाणिज्य महाविदयालय, मुंबईच्या विदयार्थ्यांचे एनएसएस शिबीर सुधागड तालुक्यातील उद्धर गावी भरले आहे. यावेळी विदयार्थी व ग्रामस्थांसमोर अंनिस पाली शाखेतर्फे चमत्काराच्या प्रयोगाचे सादरीकरण केले गेले. यावेळी विद्यार्थ्यांच्या भुत, वास्तुशास्त्र, हस्तरेषा,जन्मवेळ, भविष्य अादी अनेक गुढ व अनाकलनीय प्रश्नांची उत्तरे शास्त्रीय विवेचनातून देण्यात आली

उद्धर गावातील इको अार्किटेक्ट तुषार केळकर यांच्या सहकार्याने पाली अंनिस शाखेने हा कार्यक्रम घेतला.यावेळी अंनिस पाली शाखेचे कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांनी पाण्यावर दिवा पेटवणे, जिभेतून तार अारपार बाहेर काढणे, हवेतून सोन्याची चैन व अंगारा काढणे, पेटता कापूर खाणे, रिकाम्या गडूमधून तीर्थ काढणे यांसारखे प्रयोग विद्यार्थ्यांच्या सहभागाने करुन दाखविले. त्याद्वारे चमत्कारामागे विज्ञान आणि हातचलाखी कशी असते याची उकल करून सांगितली.

विदयार्थ्यांनी भुत असते कि नाही? तसेच वास्तूशास्त्र म्हणजे नक्की काय आहे.? हस्तरेषांद्वारे खरच भविष्य कळते का? जन्मवेळेचे अापल्या अायुष्यातील महत्व काय आहे? अादी प्रश्न विचारले. त्यावर निंबाकर यांनी सांगितले कि भुत हि संकल्पना अस्तित्वात नाही.त्याबद्दल अनेक गैरसमज व भिती पसरवली गेली आहे.वास्तुशास्त्र हे थोतांड आहे. मुळात अापली पृथ्वी नियमित परिवलन व परिभ्रमण करत असते. त्यामुळे ती कधीच स्थिर नसते. वास्तुशास्त्र हे प्रामुख्याने दिशांच्या अाधारावर काम करते. जर दिशांच स्थिर नसतील तर वास्तुशास्त्राला कोणाताच अाधार उरत नाही. वास्तुशास्त्र अवैज्ञानिक गोष्टिंवर उभे अाहे. हस्तरेषांवर भविष्य ठरत नाही तर आपल्या मुठीतून व मनगटाच्या अाधाराने अापण स्वतः अापले भविष्य ठरवू शकतो. जन्म वेळ नक्की कोणती मानावी.? अाईच्या गर्भात भ्रूण तयार झाल्यावर की, प्रसुती वेळी अाधी डोके, पाय किंवा संपुर्ण शरीर बाहेर अाल्यावरची वेळी मानावी? त्यामुळे जन्मवेळेच्या घोळात न पडता अापण अापल्या अायुष्यातील मिळालेल्या प्रत्येक वेळेच सोने केले पाहिजे. अशा प्रकारे अमित निंबाळकर यांनी विदयार्थ्यांच्या प्रश्नांचे शास्त्रीय पद्धतीने उतरे देवून निराकरण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना चिकित्सक वृत्ती कशी जोपासायला हवी याबाबत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले.यावेळी विदयार्थ्यांचा उत्साह खुप होता.

या कार्यक्रमास कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांना अंनिस कार्यकर्ते बल्लेश सावंत व केतन निंबाळकर यांनी मोलाची साथ दिली. यावेळी इको अार्किटेक्ट तुषार केळकर, लाढीदेवी रामधर माहेश्वरी रात्र वाणिज्य महाविदयालय मुंबईचे प्रा. संतोष खामगावकर, प्रा.कामिनी ठाकुर, एनएसएस चे विदयार्थी व उद्धर ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Marathi news Raigad news student camp

टॅग्स