रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सभा संपन्न

अमित गवळे
रविवार, 4 मार्च 2018

या प्रश्नांवर व विषयांवर झाली महत्वपूर्ण चर्चा
१ ) शालेय पोषण आहार योजना- जून पासून इंधनखर्च प्राप्त नाही.
२) चट्टोपाध्याय वेतनश्रेणी व निवडश्रेणी बाबत चर्चा झाली - प्रस्ताव मंजुरी मिळावी तसेच मंजूर प्रस्ताव साठी तरतूद मिळणे .
३) उच्च शिक्षण परवानगी प्रस्ताव.
४) शिक्षकांच्या गणवेश बाबत.
५) पावती बुक जमाखर्च व संघटने कडे असलेल्या जमाखर्च बाबत.

पाली : अखिल रायगड जिल्हा प्राथ शिक्षक संघाची सभा नुकतीच सुधागड तालुक्यातील परळी येथे जिल्हा संघाचे अध्यक्ष सोपान चांदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. 

सभेच्या सुरूवातीस पाली शाखेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले. या सभेला जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते, कोषाध्यक्ष प्रतीभा मोरे, उपाध्यक्ष सुषमा शिवदे, उपसरचिटणीस मोहन भोईर, संयुक्त चिटणीस प्रशांत गुरव, संघटक किशोर पाटील, पाली तालुका अध्यक्ष मोरेश्वर कांबळे, पेण तालुका  अध्यक्ष राजेंद्र पाटील, महाड अध्यक्ष दिपक कुर्डुनकर, माणगाव अध्यक्ष अमित गांगण, पोलादपूर सरचिटणीस प्रदीप वरणकर यांच्यासह  सुनील फाळे, रमेश लखिमले, जगन राठोड, रविंद्र आंधळे, राजेश जाधव, जगदीश म्हात्रे, राजेंद्र पाटील व तालुक्यातील अन्य शिक्षक  हजर होते. शेवटी मोहन भोईर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याचे जाहीर केले.

या प्रश्नांवर व विषयांवर झाली महत्वपूर्ण चर्चा
१ ) शालेय पोषण आहार योजना- जून पासून इंधनखर्च प्राप्त नाही.
२) चट्टोपाध्याय वेतनश्रेणी व निवडश्रेणी बाबत चर्चा झाली - प्रस्ताव मंजुरी मिळावी तसेच मंजूर प्रस्ताव साठी तरतूद मिळणे .
३) उच्च शिक्षण परवानगी प्रस्ताव.
४) शिक्षकांच्या गणवेश बाबत.
५) पावती बुक जमाखर्च व संघटने कडे असलेल्या जमाखर्च बाबत.
६) एमएस-सीआयटी  वसुली बाबत जोरदार चर्चा झाली. वसुली बाबत शासनाने कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती तरी याबाबत मुदतवाढीसाठी राज्य संघाचे प्रयत्न चालू आहेत.
७) सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या दुरुस्ती अनुदान,शाळा व  शिक्षक अनुदान हे अद्याप मिळाले नाही. तरी लवकरात लवकर मिळावे.
८) एसएमसी प्रशिक्षण अनुदान थकित असून ते मिळणेबाबत.
९) बिहार येथील गया येथे होणा-या अधिवेशन बाबत.
१०) १एप्रिल पासून जुनी पेन्शन योजने बाबत संघटनेने कॄती आराखडा तयार केला असून त्यापध्दतीने कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
११) शिक्षकांच्या प्रलंबित बीलांबाबत चर्चा करण्यात आली.
१२) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे.
१३) काही तालुक्याची मुदत संपलेली  आहे व काहींची  मुदतपूर्व अधिवेशन लावण्याबाबत चर्चा झाली.
१४) शिक्षकांच्या आर डी सी  बॅकेत पगार होत असताना काही अडचणी असतात त्या याबाबत चर्चा करणेत आली तरी याबाबत काही तक्रारी असलेस संघटनेकडे कळविणे.
१५) शिक्षकांना सेवेत लागलेनंतर  ब्रेक दिलेला आहे . त्या सर्व सेवा एकत्र  जोडणे बाबत प्रस्ताव पाठविणे. 
१६) निवडश्रेणी प्रशिक्षण बंद आहेत ती चालू करणे. 
१७) जिल्ह्यातील सुगम /दुर्गम शाळांबाबत संभ्रम निर्माण झाला असून तो दूर करणे. 
१८) महिला शिक्षिकांसाठी बदलीसाठी शाळा जाहीर करणेपूर्वी स़ंघटना पदाधिकारी यांना निमंत्रित करणे.  
या सर्व प्रलंबित प्रश्नावर व विषयांवर चर्चा करण्यासाठी लवकरच मुख्यकार्यकारी अधिकारी व  शिक्षणाधिकारी यांची मुलाखत घेण्यात येईल असे अध्यक्षांनी सांगितले.     

Web Title: Marathi news Raigad news teacher meeting