रायगड जिल्ह्यातील पालीवाला महाविद्यालयात उड्डाण महोत्सव संपन्न

अमित गवळे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पाली : मुंबई विद्यापीठाच्या अजिवन अध्ययन व विस्तारकार्य विभागातर्फे उड्डाण महोत्सवाचे आयोजन येथील शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयात बुधवारी (ता. 10) करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विदयार्थ्यांनी आपली प्रतिभा दाखविली.

 या उड्डाण महोत्सवास 19 महाविद्यालयातील एकूण 282 विद्यार्थी, 24 शिक्षक, 6 क्षेत्रीय समन्वय, विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक, 4 कर्मचारी सहभागी झाले होते. उड्डाण महोत्सवास सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह उदंड होता. 

यावेळी घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेत द्वितीय आणि भित्तीपत्रक स्पर्धेत प्रथम परितोषिक शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाला मिळाले. पथनाट्य स्पर्धेत तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थी हर्षद पाटील (लेखक, दिग्दर्शक), प्रणय बडे, शशिकांत बडे, जयंता भोमाले, नयन कुथे, रुपेश भोपी, अक्षय ठाकूर, मयुरी कुथे, कृतीका किशोर कुथे, कृतीका नरेश कुथे, ऐश्वर्या घासे, अंकिता चव्हाण, कल्याणी ठोंबरे आदिंचा समावेश होता. तर भिंतीपत्रक स्पर्धेत तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील ऐश्वर्या देवरे या विद्यार्थीनीचा सहभाग होता. पथनाट्य स्पर्धेचे परिक्षण रविंद्र घोडके व सौ. स्नेहल बेलवलकर यांनी केले. तर भिंतीपत्रकाचे परिक्षण देवरे सरांनी केले.

यावेळी प्रा. देविदास शिवपुजे यांनी उड्डाण या शब्दाचा अर्थ स्पष्ट करुन सांगितला. डॉ. दिलीप पाटील म्हणाले की विद्यापीठ केवळ 10 गुणांकरीता हा उपक्रम चालवित नसून यामागील उद्देश मोठा आहे. खेड्यापाड्यातील व तळागाळातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा उद्देश आहे. ग्रामीण विकासाचा दृष्टीकोन ठेवून विद्यार्थी, शिक्षक व क्षेत्रीय समन्वयक यशस्वीरित्या व प्रभावीपणे काम करीत आहेत. प्राचार्य युवराज महाजन यांनी पाण्याचे उदाहरण देवून विद्यार्थ्यांनी निर्मळ व स्वच्छंदपणे काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजित खरोसे व आभार प्रा. देविदास शिवपुजे यांनी मानले.
 
या कार्यक्रमास शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन, मुंबई विद्यापिठाच्या अजिवन अध्ययन व विस्तारकार्य विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील, सहाय्यक प्राध्यापक कुणाल जाधव, क्षेत्रीय समन्वयक प्रा. देविदास शिवपुजे, प्रा.व्हि.एस. इंदूलकर (उरण), प्रा.जयशंकर पांडे (माणगाव), प्रा. श्री कांबळे (रोहा), प्रा. श्री. परदेशी (महाड), कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. यशवंत भांडकोळी, प्रा. अजित खरोसे, डी.एस.निकम, मारुती शिंदे आदिंसह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Marathi news raigad news uddan festival