तिने दुग्ध व्यवसाय करून केली परिस्थितीवर मात

लक्ष्मण डुबे
गुरुवार, 8 मार्च 2018

लिलाबाईचे सासर रोहा तालुक्यातील नागोठणे जवळ आहे. पती काळुराम याचे आकस्मिक  निधन झाले. पतीच्या निधना मुळे ती कोलमडुन गेली. सासरी तिला खास आसा आधार नसल्यामुळे ती आपल्या वाशिवली धनगर वाडीत सहा वर्षाच्या मुलाला आणि दुस-या लहानग्याला घेऊन भावाकडे आली. भावाने तिला आधार दिला.

रसायनी : पतीचे अकरा वर्षा पुर्वी आकस्मिक निधन झाले. सुरवातीला ती हतबल झाली. दोन लहान मुलासाठी जगले पाहिजे आणि धाडसाने उभी राहिली. वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दितील धनगर आदिवासी वाडीतील लिलाबाई कोकरे या महिलेने दुग्ध व्यवसाय करून परिस्थितीवर मात केली आहे. त्यामुळे लिलाबाईची जिद्द वाखण्यासारखी आहे. लिलाबाई कडे साधे रेशनकार्ड नाही. तर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कुठल्याच सरकारी योजनाचा अद्याप बिलकुल लाभ तिला मिळालेला नाही.

लिलाबाईचे सासर रोहा तालुक्यातील नागोठणे जवळ आहे. पती काळुराम याचे आकस्मिक  निधन झाले. पतीच्या निधना मुळे ती कोलमडुन गेली. सासरी तिला खास आसा आधार नसल्यामुळे ती आपल्या वाशिवली धनगर वाडीत सहा वर्षाच्या मुलाला आणि दुस-या लहानग्याला घेऊन भावाकडे आली. भावाने तिला आधार दिला. जगण्यासाठी तिने दुग्ध व्यावसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला तीने म्हशी पाळल्या. वाडी पासुन साधारण आठ किलोमीटर अंतरावर मोहोपाडा परीसरात घरोघरी दुधाचा रतीब टाकु लागली. कामात मदतीला कुणाचा आधार नव्हता  त्यामुळे तिची सुरवातीला खुप आबळ होत होती.

आज मितीला तिच्याकडे पाच सहा म्हशी आहेत. मोठा मुलगा कल्पेश  अकरावीत आणि छोटा मुलगा दिपेश आठवीत शिकत आहे. मुल मोठी झाली आहे. ते कामात मदत करत आहे. म्हशीना वैरण आणि इतर खाद्य सर्वच विकत घ्यावा लागत आहे. महागाई मुळे दुग्धव्यावसाय  परवडत नाही. रेशन कार्ड नाही त्यामुळे तिला स्वस्त धान्याच्या दुकानात धान्या मिळत नाही. रेशन कार्ड मिळावे आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा आशी लिलाबाईची मागणी आहे. दरम्यान पतीच्या निधना नंतर लिलाबाईने परिस्थितीवर जिद्दीने मात केली आहे. हा आर्दश इतरांना घेण्या सारखा आहे. 

Web Title: Marathi news Raigad news women success story